कॉलेज अर्ज भरेना, ‘सारथी’ची शिष्यवृत्ती मिळेना

कॉलेज अर्ज भरेना, ‘सारथी’ची शिष्यवृत्ती मिळेना

Published on

महाविद्यालय अर्ज भरेना, ‘सारथी’ची शिष्यवृत्ती मिळेना
मराठा समाजातील विद्यार्थ्यांची अडचण; दुर्लक्षाचा फटका

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) मराठा व कुणबी गटातील विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्याबाबत जिल्ह्यातील काही महाविद्यालयांकडून अर्ज भरले जात नसल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीकरिता घेतली जाते. त्यातून पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीपर्यंत दरमहा ८०० रुपये असे वर्षाला ९६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तीन वर्षांपूर्वी या शिष्यवृत्तीची सुरुवात झाली. दहावीपर्यंत शाळेतून या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज शासनाकडे पाठविले जातात. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचण येत नाही. मात्र, अकरावीसाठी प्रवेशित झाल्यानंतर काही महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याची पालकांची तक्रार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचण येत आहे.

चौकट
तांत्रिक अडचण अशी
दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आपला तालुका बदलून शहर अथवा अन्य तालुक्यांमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी प्रवेशित होतात. त्यावेळी काही महाविद्यालये या विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शाळेत अर्ज करण्यास सांगतात, तर शाळा त्यांना महाविद्यालयातून अर्ज भरण्याची सूचना करत आहेत. शाळा आणि महाविद्यालये अर्जाबाबत एकमेकांकडे बोट दाखवित असल्याने नेमके अर्ज कुठे करायचे असा प्रश्‍न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. खासगी, स्वयंअर्थसहाय्यित शैक्षणिक संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर संबंधित शिष्यवृत्ती मिळत नाही. या दोन्ही तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत शासनाने मार्ग काढल्यास मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळणार आहे.

चौकट
‘एनएमएमएस’ परीक्षेत कोल्हापूरची आघाडी
गेल्यावर्षी जिल्ह्यातील २२ हजार विद्यार्थ्यांनी ‘एनएमएमएस’ परीक्षा दिली. त्यातील १५०० विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी राज्याचा कोटा १२ हजार, तर कोल्हापूरचा ५८० इतका आहे. मात्र, राज्यातील इतर काही जिल्ह्यांतील विद्यार्थी पात्र ठरत नसल्याने तो कोटा कोल्हापूरला मिळत आहे. परीक्षा देण्यासह शिष्यवृत्ती मिळविण्यात कोल्हापूरची आघाडी आहे.

कोट
तांत्रिक अडचण आणि महाविद्यालय पातळीवरील दुर्लक्षामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणे योग्य नाही. अर्ज भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविद्यालयाला शिक्षण विभाग, ‘सारथी’ने कडक सूचना द्याव्यात. अडचण दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
-प्रतीक साळुंखे, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com