कोल्हापुरात एअरविंगला मंजुरी
एनसीसी हेडक्वार्टरमध्ये
एअरविंग सुरु करण्यास मंजुरी
आमदार सतेज पाटीलः ‘एएआय’ कडून तीस वर्षांसाठी २.३५ एकर जागा मंजूर
कोल्हापूर, ता. १६ ः ‘एनसीसी’च्या येथील कोल्हापूर हेडक्वार्टरमध्ये एअरफोर्स प्रशिक्षण देणारी एअरविंग सुरु करण्याची मागणी मान्य झाली आहे. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून (एएआय) कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिट फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यासाठी २.३५ एकर जागा ३० वर्षाच्या लीजवर देण्यास मंजुरी मिळाली असल्याचे विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एअरविंग ‘एनसीसी‘च्या हेडक्वार्टरमध्ये सुरु करावे, ही मागणी पावसाळी अधिवेशनात केली होती. मंत्री संजय बनसोडे यांनी उत्तर देताना कोल्हापूर एनसीसी हेडक्वार्टरमध्ये एअरविंगसाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितले होते. कोल्हापुरात १९६० पासून एनसीसीचे ग्रुप हेडक्वार्टर सुरु आहे. याठिकाणी २१ हजार कॅडेट कार्यरत आहेत. आर्मीची ८ व नेव्हीचे १ युनिट कार्यरत आहेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. मात्र, एअरफोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध नव्हते. त्यासाठी दादूमामा ट्रस्टचे, माजी वायुसैनिक मुरलीधर देसाई यांनीही अकरा वर्षे पाठपुरावा केला. कोल्हापुरात विमानतळ उपलब्ध असल्याने एअरविंग एनसीसी सुरु करण्याची मागणी केली होती. तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
...
चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना फायदा
पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली. ११ ऑगस्टला झालेल्या एएआय बोर्डच्या बैठकीत कोल्हापूर विमानतळ येथे एअर एनसीसी युनिटच्या फ्लाईंग ट्रेनिंग हब उभारण्यास मंजुरी देण्यात आली. एनसीसी मुख्यालयात केंद्राचा एअर फोर्सचा अभ्यासक्रम सुरु व्हावा, यासाठीही पाठपुरावा केला. त्याला यश आले असून कोल्हापूरसह ४ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.