मूतखडा : लक्षणे, कारणे उपचार पध्दती
32313
मूतखडा : लक्षणे, कारणे, उपचार पद्धती
सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावत आहे. त्यामुळे त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होताना दिसते. शरीरास आवश्यक पोषक तत्वे मिळत नसल्याने अनेक आजार उद्भवतात. त्यामध्ये अलीकडे पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे मूतखड्याचे प्रमाण वाढले आहे. मूतखडा तयार होण्यास अनेक कारणे असली तरी पाणी कमी पिण्याने मूतखडा (Kidney Stone) होण्याचे प्रमाण वाढत राहते. याशिवाय अति शारीरिक श्रम किंवा व्यायाम या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मूतखडा (Kidney Stone) तयार होतो. मूत्रमार्गात होणाऱ्या जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मूतखड्यात रूपांतर होते. मांसाहार जास्त प्रमाणात केल्याने मूतखडा होतो. सततच्या मूत्रपिंडाचे संक्रमण, डायबेटिक लोकांमध्ये शुगर प्रमाणापेक्षा सतत जास्तीचे राहणे यामुळे देखील मूतखडा होतो. अनुवंशिक व genetic डिफेक्टमुळेही मूतखडा होतो. मूतखड्यामुळे वेदना, किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी (Urine to the bladder) वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे त्रास जाणवत नाही; मात्र किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा (Urinary tract obstruction due to kidney stone) निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात.
मूतखड्याची लक्षणे (Symptoms of Kidney Stone)
*ओटीपोटात आणि जननेंद्रियांजवळ (Near the genitals) निर्माण होणाऱ्या वेदना
*सतत मूत्र विसर्जन (Urinary excretion) करण्याची गरज वाटत राहणे
*एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे
*छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे तीव्र वेदना
*मूत्र विसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा जळजळ
*लघवीचा रंग गुलाबीसर लाल किंवा तपकिरी असणे
*लघवीला उग्र वास येणे
*उलट्या व मळमळ
*जंतू संसर्ग असेल तर थंडी व ताप
*मूतखडा होण्याची कारणे (Causes of kidney stones)
बहुतेक वेळा लघवी गरजेपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे म्हणजेच लघवीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किडनी स्टोन्स होतात. विशिष्ट प्रकारचा आहार, गरजेपेक्षा जास्त वजन, काही शारीरिक विकार, एखाद्या विशिष्ट रोगावर घेतली जाणारी औषधे, तसेच सप्लिमेंट्स ही किडनी स्टोन्स होण्यामागची मुख्य कारणे आहेत.
*उपचार (Treatment of Kidney)
किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, सोनोग्राफी व सिटी स्कॅन, तसेच प्रत्यक्ष स्टोनची प्रयोगशाळेतील तपासणी या चाचण्या करतात. मूतखड्याचा उपचार हा त्याचा आकार आणि तो मूत्रमार्गाच्या कुठल्या भागात स्थित आहे, यावर अवलंबून असतो. सामान्यतः मूत्रपिंडात मूत्रवाहिनी, मूत्राशय असलेले ५ ते ६ मिलिमीटरपेक्षा लहान मूतखडे औषधांनी पडून जातात; मात्र हे खडे बाहेर निघून गेलेत, याची पुष्टी करण्यासाठी सोनोग्राफी करणे गरजेचे असते. गरज असल्यास शस्त्रक्रिया सांगितली जाते. हल्ली मूतखड्याच्या शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे केल्या जातात.
१. आरआयआरएस शस्त्रक्रिया (RIRS Surgery) : मूतखडा युरेथ्रामध्ये असेल, तर छोट्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येते. त्याला यूआरएसएल असे म्हणतात. खडा फोडण्यासाठी लेझर अथवा अल्ट्रासाउंड तंत्राचा वापर केला जातो. याने जखम होत नाही.
२. पीसीएनएल शस्त्रक्रिया (PCNL Surgery) : मूत्रमार्गातून एक कमी व्यासाचे फ्लेक्सिबल दुर्बिणीद्वारे मंत्रिमंडळातील खडे लेझर किरणाद्वारे फोडले जातात.
३. युरेटेरोस्कोपी (Ureteroscopy) : मूत्र वाहिनीत साचलेले खडे युरेटेरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे कमी व्यासाच्या दुर्बिणीद्वारे लेझर अथवा लिथोकास्टद्वारा फोडून काढले जातात.
४. ओपन सर्जरी (Open Surgery) : मूत्रपिंडातील खूप मोठ्या आकाराचे खडे काढण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ही ओपन सर्जरी म्हणून ओळखली जाते.
सध्याच्या काळात विकसित अशा छोट्या दुर्बिणीद्वारे पीसीएनएल शस्त्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने केली जाते. त्यामुळे पेशंटला त्रास कमी होतो. मूत्रपिंडातील खड्यासाठी ही शस्त्रक्रिया सुवर्ण मानक शस्त्रक्रिया मानली जाते.
डॉ. वैभव पाटील,
एमबीबीएस, एम. एस. युरॉलॉजिस्ट.
-----------------------------
पुरवणी संकलन
संदीप जगताप, इचलकरंजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.