सहकारी बँकिंग क्षेत्रात चांगले बदल दिसतील

सहकारी बँकिंग क्षेत्रात चांगले बदल दिसतील

Published on

32876
....

सहकारी बँकिंगमध्ये दिसतील चांगले बदल

डॉ. उदय जोशीः शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्यान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः ‘सहकार क्षेत्राने गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार अनुभवले असले, तरी नजीकच्या कालखंडात सहकारी बँकिंग क्षेत्रासमोरील समस्या कमी होतील. आणखी चांगले बदल दिसतील’, असा आशावाद नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज् लिमिटेडचे (नॅफकब) संचालक डॉ. उदय जोशी यांनी येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासन आणि गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सहकारी बँकांची भविष्यातील वाटचाल’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते. तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे , महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे प्रमुख उपस्थित होत्या. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. जोशी म्हणाले, ‘देशात बँकांच्या वाढीला मोठी संधी आहे. सहकारी बँकांचे देशातील प्रमाण अवघे तीन टक्के आहे. त्यांनाही वाढीची संधी आहे. गेल्या तीन वर्षांत आम्ही सहकारी बँकांच्यावतीने धोरण बदलासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे खूप रदबदली केली आहे. या बँकांवरील नियंत्रण, नियमन प्रणाली अधिक सक्षम करा, पण परवानगी द्या, असा आग्रह धरला. परिणामी, रिझर्व्ह बँकेने आता सहकारी बँकांच्या अनुषंगाने धोरणात्मक लवचिकता स्वीकारली आहे. धोरणांमध्ये बँकेने अनेक सकारात्मक बदल केल्याचे जाणवते आहे. आपण आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. त्यातूनच आज सहकारी बँकिंगसाठी पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.’ अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी आभार मानले.
...
‘डिजीटल’च्या दिशेने जायला हवे
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘सहकारी बँकांनी आधुनिकतेची कास धरीत डिजीटल सुविधा उपलब्धतेच्या दिशेने जायला हवे. रिझर्व्ह बँकेच्या या संदर्भातील धोरणांचाही संशोधनात्मक अभ्यास गरजेचा आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com