

ajr52.jpg......
35974
आजरा ः येथील आजरा नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याशी कार्यवाहीबाबत चर्चा करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे. या वेळी अन्य अधिकारी.
-------------------------
ओढ्याची आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी
मृत कोंबड्या प्रकरण ः ग्रामपंचायतींना लेखी पत्र, कार्यवाहीची सूचना
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ५ ः आजरा - एरंडोळ रस्त्यावरील कासारशेत ओढ्यामध्ये मृत कोंबड्या टाकल्याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्याने आजरा तालुका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत ओढ्याची पाहणी केली. हा प्रकार कोणी केला याबाबत माहीती घेतली जात असून या परिसरातील इटे, देऊळवाडी, खानापूर, पोळगाव, एरंडोळ या ग्रामपंचायतीना लेखीपत्र दिले असून याबाबत कार्यवाहीची सुचना केली आहे. आजरा शहरजवळच हा प्रकार घडल्याने याबाबतची माहीती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्या कानावर घातली असून कार्यवाहीबाबत नगरपंचायतीमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांशी बैठक झाली.
कासारशेत ओढ्यात मृत कोंबड्याचा खच पडल्यामुळे नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. या ओढ्याचे पाणी चित्री नदीमध्ये थेट मिसळत असल्यामुळे पाणी दुषित झाले आहे. पुढील अनेक गावात पाणी पुरवठा योजना चित्रीवरून केल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. ओढ्याच्या परिसरातील ग्रामपंचायती व नगरपंचायत यांना संपर्क साधून तेथील सरपंच, ग्रामसेवक व सदस्य तसेच आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, आरोग्य विस्तार अधिकारी विनायक काटकर, आरोग्य सेवक युनुस सय्यद, प्रशांत चौधरी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्याशी प्रत्यक्ष तोंडी चर्चा करून पोल्ट्रीधारक, चिकन सेंटरचे चालक व पोल्ट्री वाहतुकदार यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी लेखी पत्र दिले आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत व यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत पातळीवर त्यांनी योग्य ती उपाययोजना करावी असे वरिष्ठांना सुचित केले. तालुका पशुवैद्योकिय अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून याबाबत त्यांच्याकडून पोल्ट्री चालक, चिकन सेंटर मालक व वाहतुकदार यांना पर्यावरणाची व सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणे तसेच मृत पक्ष्यांची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावण्यासाठी त्यांच्या स्तरावरून योग्य त्या सुचना व पाठपुरावा व्हावा असे सांगितले आहे. पोल्ट्रीधारक, वाहतुकदार, चिकन सेंटरच्या मालकांनी हलगर्जी दाखवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
------------------
* पाणी नमुने तपासणीला
या नदीच्या काठावरील गावातील पाण्याचे नुमने येत्या काही दिवसांत आरोग्य विभागाकडून घेतले जाणार आहेत. ते तपासणीसाठी विभागीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायतींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पोल्ट्रीधारकांना सुचना कराव्यात, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.