नेत्रदान उपक्रम प्रभावी राबवण्याची गरज

नेत्रदान उपक्रम प्रभावी राबवण्याची गरज

नेत्रदान उपक्रम प्रभावी राबवण्याची गरज
जिल्ह्यात २०२२-२३मध्ये १३० नेत्र संकलन ः २५० नेत्रहीन शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १३ : मृत्यूनंतर सुंदर जग पाहण्याची इच्छा असेल तर माणसाने नेत्रदान करावे असे अनेक लेखक‍, कवी सांगताना दिसतात. यावरून डोळ्याचे व दृष्टीचे महत्व अधोरेखित होते. त्यामुळे नेत्रदानास सर्वश्रेष्ठ दान मानले आहे.
नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने घाबरण्यासारखे काही नसते. नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढावी व नेत्रहिनांना पुन्हा दृष्टी मिळावी. यासाठी प्रशासन व काही सामाजिक संघटना प्रयत्न करीत असतात. त्यातून अनेकजण नेत्रदानाचे फॉर्म भरतात. मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यूची कल्पना संबंधित विभागास देण्यात येत नसल्याने अपेक्षित नेत्र संकलन होताना दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २०२२-२३ मध्ये १३० नेत्र संकलन केले आहेत. नेत्रदान उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
जागतिक दृष्टी दिन हा दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी १२ ऑक्टोबरला झाला. डोळे किती महत्वाचा अवयव आहे हे अंधांनाच माहीत आहे. नागरिकांमधून नेत्रदानचे प्रमाण वाढावे आणि एकही अंध नेत्रहीन राहू नये या प्रमुख उद्देशाने दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. या उपक्रमास कोरोनामुळे काही प्रमाणात खिळ बसली होती. या कालावधीत कोल्हापूर सीपीआर रुग्णालयातील नेत्र विभागामध्ये केवळ १०० नेत्र संकलित करण्यात आले होते. यावेळी सुमारे २५० नेत्रहीन शस्त्रक्रीयेच्या प्रतीक्षेत होते.
जिल्ह्यात सीपीआर रुग्णालयाशी संलग्न अशा पाच नेत्र पेढ्या आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होत आहे. त्यांच्या माध्यमातून वर्षाकाठी १०० ते १४० पर्यत नेत्र (कार्निया) संकलित करण्यात येत आहेत. त्यामधून सुमारे ९० दृष्टीहिनांना दृष्टी मिळण्यास मदत होते. नेत्रदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे यासाठी महिन्यातून दोन वेळा शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यासोबत शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी प्रबोधन ही करण्यात येत आहे. ज्यामुळे एखाद्या अंध व्यक्तीचे भविष्य उज्ज्वल व्हावे. मात्र अद्यापही समाजात नेत्रदानाबाबत गैरसमज, अनास्था आदींमुळे रक्तदान करणाऱ्यांच्या तुलनेत नेत्रदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. नागरिकांकडून नेत्रदानासाठी अर्ज भरला जातो. परंतू अशी व्यक्ती मृत झाल्यानंतर नातेवाईकांकडून लॅबला माहिती न देता अंत्यसंस्कार करण्यात येतो. त्यामुळे नेत्र लॅबमध्ये अत्यल्प प्रमाणात डोळ्याचे बाह्यपटल जमा होत आहेत.
---------------
मृत्यूनंतर तातडीने लॅबशी संपर्क आवश्यक
नेत्रदान हे एक वर्ष वय असलेल्या व्यक्तीपासून १०० वर्ष असलेली व्यक्ती करु शकते. तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास, चष्मा असणाऱ्या व्यक्तीही नेत्रदान करु शकतात. यासाठी इच्छापत्र लिहून द्यावे लागते. तसेच त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तातडीने नेत्र लॅबशी संपर्क साधून माहिती द्यावी लागते.
--------
सीपीआरमधील नेत्र लॅब दृष्टीक्षेप
वर्ष * नेत्रदान केलेल्यांची संख्या
२०२०-२१* १००
२०२१-२२* ९०
२०२२-२३* १३०
-------------
नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीच्या अंधमय जीवनात प्रकाश येवू शकतो. अद्यापही नेत्रदानाबाबत गैरसमज आहेत. ते प्रबोधनाने कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेत्रदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
-जॉन लोखंडे, जिल्हा समुपदेशक सीपीआर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com