जनआक्रोश पदयात्रेला प्रतिसाद द्या

जनआक्रोश पदयात्रेला प्रतिसाद द्या

जनआक्रोश पदयात्रेला प्रतिसाद द्या
शैलेश आडके ः ‘स्वाभिमानी’तर्फे शिरोळ तालुक्यात जय्यत तयारी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १३ः गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ ऑक्टोबरपासून निघणाऱ्या जनआक्रोश पदयात्रेची शिरोळ तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. केवळ स्वाभिमानीचे नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन म्हणून पदयात्रेत तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांसह विविध पक्ष, संघटनांसह बँका, पतसंस्था, सोसायट्या, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
ते म्हणाले, ‘गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये मिळावेत, अशी मागणी याआधीही स्वाभिमानीतर्फे केली होती. मात्र, कारखानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. याचाच एक भाग असणाऱ्या जनआक्रोश पदयात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. १७ ऑक्टोबरला पदयात्रेला सुरुवात होणार असून शिरोळच्या दत्त साखर कारखान्यापासून टाकळीवाडीच्या गुरुदत्त साखर कारखान्यापर्यंत शिरोळ तालुक्यातील विविध गावातून पदयात्रा निघणार आहे. यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध कारखान्यांवर पदयात्रा निघून ७ नोव्हेंबर रोजी पदयात्रा जयसिंगपूर येथील ऊस परिषदेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. या ठिकाणी गतवर्षीचे चारशे आणि तुटणाऱ्या ऊस दराची मागणी आणि आंदोलनाची दिशा निश्चित होईल.’
विविध गावातील अनेकांना पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विविध गावातील शेतकरी व ग्रामस्थ पदयात्रेतील लोकांना भाकऱ्या देणार आहेत. गावागावातून भाकऱ्या दिल्या जाणार आहेत. शिरटी, कुरुंदवाड, नांदणी आदी गावांतून बैठका घेऊन तयारी केली जात आहे. सावकर मादनाईक, शंकर नाळे, सागर संभुशेटे, राम शिंदे आदी पदयात्रेचे नियोजन करत असून तालुक्यातील सर्वच गावांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पदयात्रेला प्रतिसाद देण्याते आवाहन श्री. आडके यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com