नूलला मुलींच्या हॉकी संघाचा गौरव

नूलला मुलींच्या हॉकी संघाचा गौरव

नूल ः न्यू इंग्लिश स्कूलमधील हॉकीपटू मुलींच्या गौरवप्रसंगी राजेश पाटील, कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, सुनिल काळे, विनोद नाईकवाडी, अभय देसाई, जयसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
----------------------------------------------
नूलला मुलींच्या हॉकी संघाचा गौरव
आमदार पाटील यांची उपस्थिती ः माजी विद्यार्थ्यांकडूनही रोख बक्षीसाने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १३ ः दिल्ली येथे झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू चषक राष्ट्रीय स्तरावरील मुलींच्या हॉकी स्पर्धेत नूलमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या हॉकी संघाने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले. हा संघ नूल येथे परतताच आमदार राजेश पाटील यांनी थेट शाळेत येवून या संघातील खेळाडूंचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली अध्यक्षस्थानी होते.
दरम्यान यावेळी शाळेतील १९८४ च्या दहावीच्या बॅचने व माजी विद्यार्थी सुरेश आरबोळे यांनी अकरा हजाराचे बक्षिस देवून खेळाडूंचा सन्मान केला. राष्ट्रीय संघातील हॉकीपटू सानिका माने, हर्षा नांगरे, सोनाली पवार, सई चव्हाण, प्रांजल निकम, सानिका चिरमुरे, सावित्री बोरगल्ली, उत्कर्षा चव्हाण, स्वाती सावंत, हर्षदा पवार, भक्ती गड्डी, साक्षी माने, प्रतीक्षा कोळी, ऋतुजा आरबोळे, साक्षी धुळाज, वैष्णवी बिरंजे, क्रीडा प्रमुख रमेश चौगुले, संघ व्यवस्थापक मनोहर मांगले, संघ व्यवस्थापिका शितल कल्याणी, अश्विनी मुरकटे, हॉकी प्रशिक्षक अनिकेत मोरे, प्राचार्य सुनील काळे यांचा पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला.
श्री. पाटील, महिला हॉकीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी, आप्पासाहेब गडकरी, जयकुमार मुन्नोळी यांची भाषणे झाली. सचिव नानाप्पा माळगी, अभय देसाई (अडकूरकर), पी. एम. चव्हाण, इकबाल काजी, उपसरपंच प्रवीण शिंदे, टी. एस. चव्हाण आदी उपस्थित होते. प्राचार्य सुनील काळे यांनी प्रास्ताविक केले. संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक ए. आर. हिरेमठ यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com