आजरा ः गुरव समाजाचे आंदोलन

आजरा ः गुरव समाजाचे आंदोलन

आजऱ्यात गुरव समाजाचे धरणे आंदोलन

आजरा ः हरपवडे (ता. आजरा) येथील पारंपरिक ग्रामदैवत श्री. रासुबाई देवीच्या पुजेचा मान मिळावा, यासाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर गुरव समाजाने धरणे आंदोलन केले. आजऱ्यासह चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन येथील तहसीलदार यांना समाजाच्यावतीने देण्यात आले आहे. हरपवडे (ता. आजरा) या गावात ग्रामदैवत श्री. रासूबाई देवीचा पुजेचा मान गुरव पुजारी यांच्याकडे परंपरेने चालत आला आहे. पुजारी म्हणून देवस्थान व्यवस्थापन समितीची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद आहे. पण सध्या या मंदिरातील पुजेचा मान काढून घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने स्थापन झालेल्या गावातील स्थानिक उपसमितीने हा प्रकार घडवला आहे. पुजाऱ्यांना देवळात पुजा करण्याचा मान एकप्रकारे काढून घेतला आहे. या सर्व प्रकाराची प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, माजी सभापती मनीषा गुरव, गोविंद गुरव, देवदास गुरव, संजय गुरव, शंकर गुरव, दत्तात्रय गुरव, सुरेश गुरव, दयानंद गुरव, आनंदा गुरव, सुर्यकांत गुरव, भिवा गुरव आदी सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com