गडहिंग्लजचा बाजार बंद

गडहिंग्लजचा बाजार बंद

गडहिंग्लजला उद्याचा आठवडा बाजार बंद

गडहिंग्लज : घटस्थापना असल्याने देवीच्या मुर्तीची मिरवणुका काढण्यात अडथळा येण्याची शक्यता गृहीत धरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी गडहिंग्लजला उद्या (रविवार) भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दर रविवारी गडहिंग्लजचा आठवडा बाजार असतो. या रविवारी (ता. १५) घटस्थापना आहे. या दिवशी विविध तरूण मंडळांकडून देवीच्या मुर्तीचे मिरवणुकीने स्वागत करण्यात येते. या मिरवणुक मार्गातच आठवडा बाजार भरत असल्याने वाहतुकीला व रहदारीस अडथळा येणार आहे. तसे झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आठवडा बाजार बंद ठेवण्याची सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आदेशातून केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com