

पालिकेत कर्मचाऱ्यांनी घेतली एकतेची शपथ
कोल्हापूर, ता. १ : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल याच्या जयंतीच्यानिमित्ताने त्यांना महापालिकेत अभिवादन करण्यात आले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त कर्मचाऱ्यांनी एकतेची शपथ घेतली.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन केले होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकतेची शपथ दिली. भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञाही घेण्यात आली. यामध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कामे प्रामाणिकपणाने आणि पारदर्शक पध्दतीने करेन. व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या वेळी उपायुक्त शिल्प दरेकर, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता नारायण भोसले, नगरसचिव सुनील बिद्रे, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, आस्थापना अधीक्षक राम काटकर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, आर. के. पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.