राजाभाऊ शिरगुप्पेंची आज शोकसभा

राजाभाऊ शिरगुप्पेंची आज शोकसभा

राजाभाऊ शिरगुप्पेंची आज शोकसभा
गडहिंग्लज : विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा गडहिंग्लज येथे होणार आहे. उद्या (ता. ४) सायंकाळी साडेचारला अयोध्यानगरातील शारदा भवनमध्ये ही शोकसभा होईल. महात्मा गांधी विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा, समाजवादी प्रबोधिनी, वंचित बहुजन आघाडीसह विविध पुरोगामी संघटनांतर्फे ही शोकसभा आयोजित केली आहे. शोकसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
--------------------------
सुजोक हॉस्पिटलचे उद्या उद्‍घाटन
गडहिंग्लज : येथील डॉ. सुजोक अॅक्युप्रेशर अॅण्ड अॅक्युपंक्चर हॉस्पिटलचे रविवारी (ता. ५) उद्‍घाटन होणार आहे. डॉक्टर्स कॉलनीतील घेवडे प्लाझा येथे हॉस्पिटल सुरु होत आहे. सायंकाळी पाचला उद्‍घाटनचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन होईल. कुशापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
------------------------------
मुख्याध्यापक संघटनेतर्फे पुरस्कार वितरण
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे मंगळवारी (ता.७) पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ होणार आहे. माध्यमिक पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी साडेअकराला हा कार्यक्रम होईल. उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, इतिहास अभ्यासक विनायक रेडेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष बी. जी. काटे अध्यक्षस्थानी असतील. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, १०० टक्के निकालाच्या शाळांचा सत्कार केला जाणार आहे. हस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे तसेच आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
---------------------------
gad32.jpg
42828
गडहिंग्लज : राज्यस्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेला मुलींचा रिले संघ.

माने महाविद्यालयाच्या खेळाडूंचे यश
गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत यश मिळवले. सहा सुवर्ण पदके तर दोन रौप्य पदके पटकावली. वैष्णवी रावळ हिची राष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने ८०० मीटर, १५०० मीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. मेघना मोहिते, रसिका शिंत्रे, श्रद्धा शिंदे, सुकन्या शिवणे, आरती पाटील यांच्या संघाने ४X४०० रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. महाविद्यालयातर्फे या खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर पर्यवेक्षक तानाजी चौगुले, क्रीडा विभागप्रमुख डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------------
gad33.jpg :
42829
गौरव चव्हाण

गौरव चव्हाणला दोन सुवर्ण, दोन कांस्य
गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयाचा जलतरणपटू गौरव चव्हाण याने इचलकरंजी येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय स्विमिंग स्पर्धेत दोन सुवर्ण तर दोन कांस्य पदके पटकावली. ५० मीटर बॅकस्ट्रोक व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदक तर ५० मीटर फ्रिस्टाईल व १०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात कास्यपदक पटकावले. त्याला संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा विभागप्रमुख डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com