ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

कोल्हापूर, ता.३ : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर १२ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये १ हजार ३८२ उमदेवार सदस्यपदासाठी निवडणूक लढविणार आहेत. तर, १९२ उमेदवार थेट सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच पदासाठी ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, सार्वत्रिक निवडणुका असणाऱ्या १५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. ५) मतदान होत असून सोमवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपलेल्या याशिवाय नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामुळे गावागावांतील राजकारण तापले आहे. प्रत्येक घराघरात उमेदवार आपला छाप उमटविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमदेवारांना गावच्या गाव पिंजून काढावे लागत आहे. राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर ३ हजार ८० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत.
...
बिनविरोध ग्रामपंचायती अशा...

केकतवाडी व निटवडे (ता. करवीर), बुझवडे, आंबेवाडी व मिरवेल (ता.चंदगड), हणबरवाडी, चांदमवाडी आणि निष्णप (ता. भुदरगड), रामणवाडी, मालवे आणि चक्रेश्र्वरवाडी (ता. राधानगरी), ऐनवाडी व गावडी (ता. शाहूवाडी), चांदेवाडी (ता. आजरा) आणि माळवाडी (ता. पन्हाळा).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com