गुणवंत कामगार पुरस्कार

गुणवंत कामगार पुरस्कार

Published on

42994

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार
संताराम जाधव यांना प्रदान

कोल्हापूर ः एसटी महामंडळात यांत्रिक पदावर काम करणारे संताराम यशवंत जाधव यांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जाधव हे मूळचे घुणकी (ता. हातकणंगले) येथील आहेत. ते एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकावरील यंत्रशाळेत यांत्रिक पदावर काम करतात. नोकरीसोबत ते ३० वर्षे नाटकांत विविध भूमिका करीत आहेत. त्यासोबत ३५ वेळा रक्तदानही केले आहे. विविध सामाजिक कार्यांत सहभागही घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.