निदर्शने

निदर्शने

Published on

‘कोळी नोंद असलेल्या समूहांना
जात, वैधता प्रमाणपत्रे मिळावीत’

कोल्हापूर : कोळी नोंद असलेल्या समूहांना महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, कोळी महादेवची जात व वैधता प्रमाणपत्रे मिळावीत, या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमनतर्फे (ऑफ्रोह) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने करण्यात आली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री मधुकर पिचड यांची जात ‘कोळी’ नोंद असताना त्यांना ज्या निकषाने जात व वैधता प्रमाणपत्र दिले त्याच निकषाने अनूसुचित क्षेत्राबाहेरील ‘कोळी’ नोंद असलेल्या समूहांना दोन्ही प्रमाणपत्रे मिळणे जरूरीचे आहे. नगरमधील राहुरी, संगमनेर, अकोले व पुणेमधील आंबेगाव, नारायणगाव, भिमाशंकर व मावळ भागात ‘कोळी’ नोंदी आढळतात. त्यांना जात व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी अण्णासाहेब शिरगावे, सुरेश कोळी, शिवाजी कोळी, एन. डी. कोळी, तात्या कोळी, नरेंद्र पराते, रवींद्र हेडाऊ, रमेश वरूडकर, शरद गोलाईत यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.