दिवाळीनंतर वस्त्रोद्योगाला झळाळीची आशा

दिवाळीनंतर वस्त्रोद्योगाला झळाळीची आशा

Published on

दिवाळीनंतर वस्त्रोद्योगाला झळाळीची आशा
सूत, कापूस दरातील चढ- उतारीमुळे मंदीची स्थिती ः कापड मागणी, दरवाढीकडे यंत्रमाग उद्योजकांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ ः दीड वर्षापासून वस्त्रोद्योग अभूतपूर्व मंदीचा सामना करीत आहे. सूत व कापूस दरातील चढ - उतार यामुळे वस्त्रोद्योगात प्रचंड अस्थीरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर किमान दिवाळीनंतर या परिस्थीतीत सुधारणा होईल, अशी यंत्रमागधारकांना आशा आहे.
वस्त्रोद्योगासाठी लागणार प्रमुख कच्चा माल असलेल्या कापूस आणि सूताच्या दरात दीड वर्षापासून सतत चढ - उतार होत आहे. त्यामुळे सतत अस्थीर वातावरण निर्माण होत असल्यामुळे यंत्रमाग उद्योगाच्या चाकांनी अपेक्षीत गती घेतलेली नाही. दुसरीकडे शासन पातळीवरील उदासिन भूमिका ही वस्त्रोद्योगातील अस्वस्थता वाढीचे दुसरे कारण आहे. नवे वस्त्रोद्योग धोरणही ही परिस्थीती अद्याप बदलू शकलेले नाही. किंबहून शासनातील अस्थीरताही वस्त्रोद्योगास मारक ठरत आहे.
कापूस आणि सूत दरात स्थैर्य आल्यास कापड उत्पादनाला गती मिळले. या शिवाय सूतगिरण्यांनाही दिलासा मिळतो. कापडाला दर येवून मागणीही वाढते. पण तसे चित्र सध्या दिसत नसल्यामुळे यंत्रमाग उद्योजक हैराण झाले आहेत. इचलकरंजीतील कापड खरेदी करणा-या विविध शहरातील कापड व्यापा-यांनी गुंतवणूकीसाठी अन्य पर्यायांचा वापर सुरु केला आहे. यामध्ये शेअर मार्केटला अधिक प्राधान्य देत असल्याचे वस्त्रोद्योगातील जाणकारांनी सांगीतले. त्यामुळे अशा अस्थीर वातारवणात कापड खरेदीकडे अशा व्यापारी मंडळीची उदासिनता हळूहळू समोर येत आहे.
मात्र दिवाळीनंतर सूत आणि कापूस दरात स्थीरता येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात मंदी दूर होवून तेजीची झळाळी निर्माण होईल, असा अंदाज आहे. बऱ्याचवेळा दिवाळीनंतरच कापड खरेदीच्या सौद्याला सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीनंतर तरी कापडाला मागणी व दर येईल, अशा आशेवर यंत्रमागधारक सध्या तरी आहेत. यापूर्वीही वस्त्रोद्योगाने तेजी-मंदीचा अनुभव अनुभवला आहे. मात्र प्रथमच मंदीची परिस्थीती दिर्घकाळ असल्याची माहिती वस्त्रोद्योगातून देण्यात आली.
---------
बोनस वाटपास सुरुवात
बोनस प्रश्नावरुन इचलकरंजीने मालक व कामगार यांच्यातील टोकाचा संघर्ष एकेकाळी पाहिला आहे. पण आता तशी परिस्थीती राहीलेली नाही. आता मालक व कामगार यांच्या सौदार्हपूर्ण संबंधावरच कारखाना पातळीवर बोनसचा प्रश्न मिटतो. यंदाही मंदी असली तरी मालकांकडून कामगारांची दिवाळी होण्यासाठी आतापासूनच बोनसचे वाटप सुरु केले आहे. पुढील आठवड्या अखेरीस सर्व कामगारांच्या हातात बोनस पडणार आहे. त्यानंतर खरेदीला उधाण येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.