दिवाळी पहाट मैफल प्रवेशिका आजपासून

दिवाळी पहाट मैफल प्रवेशिका आजपासून
Published on

लोगो व फोटो कालच्या बातमीतून
...


‘दिवाळी पहाट’ मैफलीच्या सन्मानिका आजपासून

सावनी शेंडे यांचा स्वराभिषेकः मंगळवारी रंगणार चितळे उद्योग समूह प्रस्तुत मैफल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांच्या स्वराभिषेकात चिंब भिजत यंदा कोल्हापूरकर दिवाळीचे स्वागत करणार आहेत. त्यांची ही सुरेल मैफल मंगळवारी (ता. १४) पहाटे पाचला रंगणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. चितळे उद्योग समूह प्रस्तुत ‘दिवाळी पहाट’ ही मैफल हॉटेल सयाजी येथील ‘साज लॉन’ मध्ये होईल. तनिष्क ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, माय ह्युंदाई, तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड, काजवे फर्निचर, अविष्कार इन्फ्रा हे सहप्रायोजक आहेत. हॉटेल सयाजी व डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटी प्रा. लिमिटेड हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.
सावनी शेंडे आपल्या आजीकडून म्हणजे किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कुसुम शेंडे यांच्याकडून रितसर संगीत शिकल्या. प्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यामुळेच त्यांच्या गायनात किराणा - ग्वाल्हेर गायकीचा संगम आहे. त्यांना राहुल गोळे (हार्मोनियम), अरूण गवई (तबला) यांची साथसंगत लाभेल.
कार्यक्रम विनामूल्य असून, त्यासाठी उद्या (बुधवार) पासून सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत शिवाजी उद्यमनगर येथील ‘सकाळ’ च्या शहर कार्यालयासह चितळे एक्सप्रेस (राजारामपुरी), तनिष्क ज्वेलर्स (दसरा चौक) येथे सन्मानिका उपलब्ध केल्या आहेत. संपर्क ः सूरज जमादारः ९५५२५८१९१८
...
हे आहेत प्रायोजक
टायटल प्रायोजक ः चितळे उद्योग समूह
मुख्य प्रायोजक ः तनिष्क ज्वेलर्स
सहप्रायोजक ः माय ह्युंदाई, तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड, काजवे फर्निचर, अविष्कार इन्फ्रा
हॉस्पिटॅलिटी पार्टनर ः हॉटेल सयाजी व डी. वाय. पी. हॉस्पीटॅलिटी प्रा. लिमिटेड
...
काजवे फर्निचरकडून आकर्षक भेटवस्तू
दिवाळी पहाट कार्यक्रमात पारंपरिक वेशभुषेत येणाऱ्या रसिकांना काजवे फर्निचरतर्फे आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com