

gad281.jpg
47757
गडहिंग्लज : गोडसाखर निवृत्त कामगार संघटनेतर्फे राजेंद्र यादव यांना निवेदन देण्यात आले.
-----------------------------------
जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घ्या
‘गोडसाखर’ निवृत्त कामगारांची मागणी : ...अन्यथा सोमवारी रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : गडहिंग्लज साखर कारखाना (गोडसाखर) प्रशासनाकडून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेची माहिती ११ महिने उलटले तरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे कारखाना प्रशासन व निवृत्त कामगारांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी. अन्यथा सोमवारी (ता. ४) गडहिंग्लज शहरातून अर्धनग्न मोर्चा व बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गोडसाखरच्या निवृत्त कामगारांनी दिला आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
गोडसाखरचे अध्यक्ष, कारखाना प्रशासन व निवृत्त कामगारांची १७ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. यात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण देय रकमेची व्यक्तिगत माहिती देण्याचे ठरले होते. तसेच कामगार न्यायालयातील दावा मागे घेणे व ब्रीस्क कंपनीकडून येणे रक्कम मिळवून देण्यासाठी कारखान्याकडून पाठपुरावा करण्याचे ठरले होते; पण ११ महिने उलटले तरी यातील कोणत्याच बाबीची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कारखाना प्रशासन, निवृत्त कामगार संघटना यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे; अन्यथा सोमवारी अर्धनग्न मोर्चा व बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कामगार वयोवृद्ध आहेत. त्यामुळे आंदोलनात कोणत्याही प्रकारची गंभीर घटना घडल्यास त्यास कारखान्याचे संचालक व जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असे नमूद केले आहे.
नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी निवेदन स्वीकारले. गोडसाखर निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, दिनकर खोराटे, पांडुरंग कदम, अशोक कांबळे, संभाजी बुगडे, महादेव मांगले, अरुण लोंढे, आप्पासाहेब लोंढे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.