

नेमबाजांचे लक्ष्य टप्यात
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात २५ इलेकट्रॉनिक टारगेट
सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २८ ः छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे बसवलेल्या इलेकट्रॉनिक टारगेटमुळे अनेक खेळाडूंना फायदा होणार आहे. ज्या खेळाडूंना सरावासाठी पुणे अथवा अन्य ठिकाणी जावे लागत होते त्यांच्यासाठी कोल्हापूर ''प्राईम डेस्टिनेशन'' ठरणार आहे.
अनेक वर्षांपासून विभागीय क्रीडा संकुलाची कामे अपूर्ण आहेत. याचा फटका खेळाडूंना बसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंसाठीचे असणारे हे संकुल १४ वर्ष उलटले तरीही पूर्ण क्षमतेने सुरु झाले नाही. मात्र, याच संकुलामध्ये असणाऱ्या शूटिंग रेंजचा कायापालट मात्र झाला आहे. सध्या या ठिकाणी बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक टार्गेटमुळे येथील नेमबाजी खेळाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
असा होईल फायदा
जिल्हाभरामध्ये नवोदित व व्यावसायिक असे सुमारे १ हजार खेळाडू आहेत. यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील खेळाडू उच्चतम सरावासाठी कोल्हापूरसह पुणे, मुंबई याच ठिकाणी जातात. केवळ या ४ जिल्ह्यातील खेळाडूंचा विचार केला तर यांची संख्या ५०० हुन अधिक आहे. या सर्वांसाठी कोल्हापूर हे सर्वात सोयीचे ठिकाण ठरणार आहे. पुणे व मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये सरावासाठी किमान १५ दिवस गेल्यास येणारा खर्च ५० ते ७० हजरांच्या आसपास असतो. हाच सराव कोल्हापूरमध्ये झाल्यास महिन्याचा खर्च केवळ २० ते ३० हजारांमध्ये होऊ शकतो. हे खेळडूंसाठी आर्थिकत दृष्टीने परवडणारे आहे.
२८ टार्गेट
या संकुलामध्ये १०, २५ व ५० मीटर अशा रेंज असून एकूण २८ इलेक्ट्रिक टार्गेट बसवली आहेत. यामध्ये १० मीटर साठी १५, २५ मीटरसाठी ५ व ५० मीटर आऊटडोअरसाठी ८ टार्गेट आहेत. यासह मॅन्युअल टार्गेटही असल्यामुळे अन्य खेळाडूंची गैरसोय होणार नाही.
संधीचे नवे दालन
भारतीय नेमबाजीमध्ये कोल्हापूरचे नाव खूप मानाने घेतले जाते. यासाठी येथील खेळाडूंची कामगिरी महत्वाची ठरली आहे. असे अनेक खेळाडू सध्या नावोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत, तर याशिवाय खेळाडू प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, डायटिशियन, फिजिओ अशा अनेक संधी या निमित्ताने उपलब्ध झाल्या आहेत.
नाममात्र शुल्क
अश्या प्रकारच्या इ टार्गेट वर सराव करण्यासाठी शासकीय नियमानुसार शुल्काची आकारणी केली जाते. वैयक्तिक ठिकाणी सरावाला गेल्यास हेच शुल्क अधिक आहे. यामुळे माफक शुल्कात आंतराष्ट्रीय मानकानुसार सराव करता येणार आहे.
दुधाळीमध्ये १० टार्गेट
कोल्हापूर महानगर पालिकेच्या दुधाळी शूटिंग रेंज वर देखील १० मीटरच्या रेंज मध्ये १० ई टार्गेट आहेत. या ठिकाणी देखील सध्या सराव सुरु आहे.
कोट
इलेकट्रॉनिक टार्गेटमुळे खेळाडूंना स्पर्धात्मक पातळीवरील सराव अधिक प्रमाणात करता येणे शक्य झाले आहे. शिवाय कोल्हापूरचे वातावरण हे खेळडून नेहमी पोषक व प्रोत्साहन देणारेच आहे. सोबतच चांगले प्रशिक्षक घडण्यास या निमित्ताने मदत होणार आहे.
-माणिक वाघमारे, विभागीय उपसंचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.