

47895,47896
इचलकरंजी : मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक दुकानांच्या नामफलकांची मोडतोड केली. 2) यावेळी आस्थापना चालक व कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.
...
अन्य भाषेतील नामफलकांची
इचलकरंजीत मनसेकडून मोडतोड
मलाबादे चौकात वातावरण तणावपूर्ण
इचलकरंजी, ता.२८ : इचलकरंजी शहरात अन्य भाषेत असणाऱ्या दुकानांच्या नामफलकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोडतोड केली. अचानक नामफलकांची मोडतोड सुरु झाल्याने मलाबादे चौकात वातावरण तणावपूर्ण बनले होते. तर काही ठिकाणी दुकानदार व मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस प्रशासनाने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन दिवसांत दुकानांचे नामफलक मराठीत न झाल्यास पुन्हा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला.
महाराष्ट्र शासन राज्यपत्र २३ मार्च २०१८ च्या निर्णयानुसार राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर नामफलक मराठीत लिहिण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. या विरोधात काही व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंतचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सुप्रीम कोर्टानेही व्यापारांना २५ नोव्हेंबरपर्यंत नामफलक मराठी भाषेत करा, असा आदेश दिला. त्याची मुदत शनिवारी संपली आहे. मात्र शनिवार ते सोमवारपर्यंत शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने मंगळवारी शासकीय अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र मंगळवारीही अन्य भाषेत नामफलक असलेल्या आस्थापनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी मलाबादे चौकात एकत्र जमून स्वत: अन्य भाषेतील फलक हटविण्यास सुरुवात केली. जमावाकडून दुकानांच्या नामफलकांची अचानक मोडतोड सुरू झाल्याने दुकान मालकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली होती. यावेळी काही आस्थापना चालक एक दिवसाचा अवधी मागताना दिसून आले. मात्र आक्रमक झालेले मनसे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हेत. घटनेची माहिती कळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत आंदोलकाना शांत केले. मात्र दोन दिवसांत शहरातील अन्य भाषेतील नामफलक मराठीत झाले नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सांगण्यात आले.
...
सुचनांकडे दुर्लक्ष
राज्य शासनाच्या राज्यपत्र निर्णयाच्या अनुषंगाने इचलकरंजी परिसरामधील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत करण्यात यावेत, याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सूचना केल्या होत्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही निवेदन व प्रत्यक्ष भेटून अन्यभाषेतील नामफलक मराठीमध्ये करण्याची विनंती केली होती. मात्र यावेळी या आस्थापनांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.