दलित वस्तीच्या ३९ कोटींच्या निधी त्रांगटे सुटेना

दलित वस्तीच्या ३९ कोटींच्या निधी त्रांगटे सुटेना
Published on

लोगो ः जिल्हा परिषद
-
दलित वस्तीच्या निधीचे त्रांगडे सुटेना
आमदार-खासदारांच्या स्वीय सहायकांची ईर्षा : ‘सीईओं’ना घ्यावी लागणार माहिती

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : जिल्ह्यातील दलित वस्तीतील कामे तत्काळ करावीत, यासाठी ३९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे वाटप करून वर्क ऑर्डरही झाली. मात्र, तत्कालिन पालकमंत्र्यांनी याला स्थगिती देत नवीन कामांचे वाटप झाले. यामध्ये गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ही निधींची कामे सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. काही आमदार व खासदारांचे स्वीय सहायक हा निधी आम्हीच खेचून आणला असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एकाने सांगितली की दुसऱ्याकडून त्याला अडथळा आणला जातो, अशीच चालढकल सुरू आहे. त्यामुळे अजूनही निधीचे त्रांगडे सुटलेले नाही.
पूर्वी ज्या कामांना वर्कऑर्डर दिली होती त्यात माणगाव व्यतिरिक्त इतर निधी वाटप करताना मोठ्या प्रमाणात काही आमदार खासदार यांच्या स्वीयसहायकांनी हस्तक्षेप केला. एका-एका गावामध्ये जो पाठपुरावा करत होता, तो प्रत्येकजण हा निधी आपणच आल्याचे सांगत राहिला. खासदारांचा स्वीयसहायक म्हणतो हा निधी आपणच आणला, तर आमदारांचाही स्वीयसहायक हा निधी आपणच आणल्याचे सांगत राहिल्याने मोठी ईर्षा निर्माण झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारीची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नऊ महिन्यांत किती कामांना पैसे दिले. कुठे-कुठे कामे सुरू झाली, याची चौकशी करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी वर्कऑर्डर होऊनही कामे सुरू झालेली नाहीत. यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे का? कोण या निधीला विरोध करत आहे का? याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. वेळेत यावर निर्णय न झाल्यास हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे.

चौकट
नियोजनानंतरही काम सुरू नाही
या निधीतून ज्या-त्या गावांमधील मंदिर, रस्‍ते, गटर्स या नियमित कामासह दलित वस्‍तीत व्यायामशाळा, ओपन जीमसह इतर कामांचे तत्कालिन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनी नियोजन केले. कोणती कामे घ्यावीत, ही कामे कोणी करावीत यावरही चर्चा झाली. दलित वस्‍तीतील कामे ही अनुसूचित जातीच्या कंत्राटदारांना द्यावीत, यावर नियोजन झाले होते. मात्र, नऊ महिन्यांहून अधिककाळ या निधीतील काम अद्याप सुरू झालेले नाही. ‍

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com