

47911
तारदाळ तंटामुक्त अध्यक्षपदी रमेश नर्मदे
तारदाळ, ता.२८ : तारदाळ ग्रामपंचायतची आज विशेष ग्रामसभा झाली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी विषय ठेवला होता. महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदासाठी रमेश नर्मदे यांनी अर्ज दाखल केला होता. विरोधात एकही अर्ज न आल्याने ग्रामविकास अधिकारी कुमार वंजीरे यांनी नर्मदे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी समर्थकांनी जल्लोष केला. निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार होत्या.
यावेळी मावळते तंटामुक्त अध्यक्ष जयप्रकाश भगत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. नूतन अध्यक्षपदी निवड झालेल्या रमेश नर्मदे यांच्या निवडी प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे, उपसरपंच अकबर करडी, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे, मृत्युंजय पाटील, नितीन खोचरे, सूर्यकांत जाधव, विमल पवार, दिपाली कोराने, राणी माने, राणी शिंदे, विनोद कोराणे आदी उपस्थित होते. सत्कारला उत्तर देताना रमेश नर्मदे म्हणाले, ‘गावातील तंटे मिटवून गावामध्ये एकोपा राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.’ अनिल नर्मदे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.