नव मतदार नोंदणी बातमी

नव मतदार नोंदणी बातमी
Published on

मतदार नोंदणीला तरुणांचा अल्प प्रतिसाद
जिल्ह्यातील १ लाख २४ हजार २९६ तरुणांची नोंदणी बाकी

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका बजवाणाऱ्या तरुणाईचा मतदार नोंदणीला मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेसाठी राबवलेल्या विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत रविवारपर्यंत (ता.२६) झालेल्या नोंदणीत १८ ते १९ वयोगटातील ९ हजार ८२६ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. सध्या जिल्ह्यात १९ हजार ८७८ नव मतदार आहेत. जिल्ह्यात १८ ते १९ या वयातील तरुणांची संख्या १ लाख ५४ हजार इतकी असून, अद्याप १ लाख २४ हजार २९६ तरुणांची नोंद नवमतदार म्हणून करणे बाकी आहे.
लोकसभा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. १८ ते १९ या वयोगटातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यासाठी महाविद्यालयात नोंदणी शिबिरेही घेतली आहेत. तसेच ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. मात्र, तरुणांनी आपली नोंदणी करून घेण्याकडे फारसे गांभिर्याने पाहिलेले नाही असे आकडेवारीतून दिसते. जिल्ह्यात अद्याप १८ ते १९ या वयोगटातील १ लाख २४ हजार २९६ जणांची नोंदणी झालेली नाही. अधिकाधिक तरुणांनी लवकरात लवकर आपली मतदार म्हणून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चार्ट करणे
विधानसभा मतदारसंघनिहय मंगळवारपर्यंतची नोंदणी (वयोगट १८ ते १९)
चंदगड ११५५
राधानगरी १२०८
कागल १५१८
कोल्हापूर (दक्षिण) १५७३
करवीर १४६८
कोल्हापूर (उत्तर) ६९७
हातकणंगले ७४३
इचलकरंजी २१७
शिरोळ ४५८
शाहुवाडी ७८९
-----------------------------------------------------
एकूण ९ हजार ८२६
----------------------------------------------------------------
ठळक चौकट
जिल्ह्यातील मतदारांचा आढावा
प्रारुपमतदार यादीतील संख्या ः ३१ लाख ५७ हजार ३८८
पुरूष मतदारः १६ लाख १३ हजार ७१५
महिला मतदारः १५ लाख ४३ हजार ५३५
तृतीयपंथी मतदार ः १३८
लोकसंख्येच्या तुलनेत टक्का ः ७६.११ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com