संजय सावंत पत्रक

संजय सावंत पत्रक
Published on

‘सूर्यवंशी कॉलनी भाजी मंडईतील
प्रलंबित सुविधांचा प्रश्‍न मिटवावा’
कोल्हापूर, ता. २८ ः राजोपाध्येनगरमधील सूर्यवंशी कॉलनीमधील भाजी मंडईच्या बांधकामानंतर वीज, इतर सुविधांबाबत सातत्याने मागणी करूनही त्यांची पूर्तता झाली नाही. या मंडईसाठी भाजपने सतत पाठपुरावा करून निधी मिळवला. आता सर्वपक्षीय नेत्यांनी प्रलंबित सुविधांचा प्रश्‍न मिटवावा, असे पत्रक भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे, २०१२ मध्ये चंद्रकांत पाटील यांना आरक्षित जागेवर मंडई बांधण्यासाठी निधीची मागणी केली होती. २०१४ मध्ये त्या जागेवर बेकायदेशीर अपार्टमेंट बांधण्याचा प्रयत्न आम्ही तुळजाभवानी वसाहतीमधील भाजी विक्रेत्यांना घेऊन मोडून काढला. अपुऱ्या सुविधांमुळे ते परत तुळजाभवानी वसाहतीमध्ये जाऊन बसले. त्यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका मनीषा कुंभार यांच्या कारकिर्दीत मंत्री चंद्रकांत पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे पाठपुरावा करून मंडईसाठी २०१९ मध्ये ६० लाखांचा निधी आणून बांधकाम पूर्ण केले. वीज व इतर सुविधा नसल्याने मंडई सुरू करता आली नाही. पाठपुरावा करूनही प्रशासकांनी सुविधा पूर्ण केल्या नाहीत. बांधकाम भाजपकडून झाले आहे. इतर पक्षांच्या नेत्यांना निधी देता आला नाही. वाद करण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सुविधांचा प्रश्न सोडवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com