

फोटो -
...
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने
मोबाईल चोरणाऱ्यास अटक
कोल्हापूर, ता.२८ः नांदेडच्या प्रवाशाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईल हॅण्डसेट पळवणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. रोहित सुरेश पोवार (वय २१, रा. दत्तमंदिरजवळ, राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल हॅण्डसेट आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. २० नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजता लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने हॅण्डसेट पळवला होता. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सचिन पुरुषोत्तम मोहनपूरकर (वय ४२,रा.आंबिकानर, रिंगरोड.जि.नांदेड) हे कोल्हापुरातील काम संपवून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जात होते. तेव्हा त्यांना बस, रिक्षा न मिळाल्यामुळे त्यांनी मोटारसायकलस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यावेळी लिफ्ट देऊन रोहितने मित्राला कॉल करायचा आहे, असे सांगून हॅण्डसेट पळवला. याप्रकरणी मोहन पुरकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास करताना कॉन्स्टेबल युक्ती ठोंबरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, आज पोवार हा शेंडापार्क येथे मोबाईल हॅण्डसेट विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. तेथे सापळा रचून पोवारला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.