डीवायपी

डीवायपी
Published on

48622

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये
एआरटी सेंटरचा प्रारंभ

कोल्हापूर, ता. १ ः कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून एआरटी सेंटरला प्रारंभ झाला. जिल्हा एड्‍स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल यांच्या हस्ते या केंद्राचा प्रारंभ झाला. या सेंटरमध्ये एचआयव्ही रुग्णांना कायमस्वरुपी मोफत सेवा आणि उपचार मिळणार आहेत.
एचआयव्हीचा फैलाव रोखण्यासाठी आणि एड्‍सग्रस्त रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच रुग्णांना अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या एआरटी सेंटरद्वारे उपचार सुविधा मिळणार आहे. एड्‍सग्रस्त रुग्णांनी या ठिकाणी उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मुदगल यांनी केले.
एचआयव्ही एड्सबाबत सातत्याने केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे जिल्ह्यात एड्‍स रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात चांगले यश मिळाले आहे. या एआरटी सेंटरमुळे एड्स नियंत्रण मोहिमेला अधिक बळ मिळेल असा विश्वास शिपूरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. महादेव माने, डॉ. सुचिता देशमुख, एआरटी सेंटरचे प्रमुख डॉ. पी. जी. चौगुले, उपकुलसचिव संजय जाधव, सहायक कुलसचिव अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य विभागाचे समन्वय अधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com