शाहू महाविद्यालय

शाहू महाविद्यालय

पत्रकारांना समाजाने प्रोत्साहीत
करावे ः डॉ. टी. एस. पाटील
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘‘सामान्य माणसांच जगणं सुसह्य करण्यासाठी प्रसार माध्यमातील प्रतिनिधी करीत असलेले जागृतीचे काम समाज हिताचे आहे. येत्या काळात प्रसारमाध्यमांची भूमिका अधिक टोकदार व्हावी, त्यातून निकोप समाज निर्मितीला बळ लाभावे, जागृती घडावी यासाठी पत्रकारांना समाजाने प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे.’’ अशी अपेक्षा माजी प्राचार्य प्रा. डॉ. टी. एस. पाटील यांनी व्यक्त केली.
कदमवाडी रोडवरील राजर्षि शाहू महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसार माध्यमातील प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. सिंधू आवळे, प्रा. डॉ. पी. एस. चौगुले, प्रा.डॉ. महेश रणदिवे, प्रा. डॉ. अंकूश घुले आदी उपस्थित होते.
-----------
उषाराजे हायस्कूलमध्ये पत्रकार दिन
कोल्हापूर ः ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये पत्रकार दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. डी. चौधरी होत्या. पत्रकार अश्‍विनी टेंबे व नंदिनी नरेवाडी यांना ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. या वेळी उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनिस, पर्यवेक्षक एस. के. मिठारी, एस. एस. पुजारी, एस. एस. पडवळ उपस्थित होते. आर. एम. कवठे यांनी सुत्रसंचालन केले. राहूल टिपुगडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com