महसूल कर्मचारी निवडणूक

महसूल कर्मचारी निवडणूक

महसूल कर्मचारी
पतसंस्थेसाठी आज मतदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सत्ताधारी महालक्ष्मी सर्वसमावेशक पॅनेलला ‘विमान’ व विरोधी राजर्षी शाहू विकास पॅनेलला ‘कपबशी’ चिन्ह मिळाले आहे. या शिवाय पाच अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. रविवारी (ता.७) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी होईल. उपनिबंधक ए. पी. खामकर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या निवडणुकीत १५ संचालक पदांसाठी ३५ उमेदवार रिंगणार आहेत. निवडणुकीत ५०८ सभासद मतदान करणार असून मिरजकर तिकटी येथील नुतन मराठी हायस्कूलमध्ये मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com