कोल्हापूर कला महोत्सव फेब्रुवारीत

कोल्हापूर कला महोत्सव फेब्रुवारीत

फेब्रुवारीमध्ये रंगणार
कोल्हापूर कला महोत्सव

आमदार सतेज पाटीलः कोल्हापूर आर्ट फौंडेशनतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः येथील कोल्हापूर आर्ट फौंडेशन संस्थेतर्फे चौथा कोल्हापूर कला महोत्सव २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान दसरा चौकातील मैदानावर रंगणार आहे. चित्र, शिल्पकला क्षेत्रातील कलाकार दर्जेदार कलाकृतीसह महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला एका नव्या वळणावर उभी आहे. कलाक्षेत्रातील नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पूरक ठरावेत. स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने महोत्सव होणार आहे. यापूर्वी २०११, २०१४ आणि २०१८ या वर्षी हा महोत्सव झाला होता. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच तीन ते चार लाख कला रसिकांनी भेट दिली होती. कलाक्षेत्रासाठी सशक्त व्यासपीठ मिळाल्याने महोत्सवात कलाकृतींची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली असून यंदाही महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळेल, असेही पत्रकात म्हंटले आहे.
...
असा असेल महोत्सव...
दसरा चौकातील मैदानावर भव्य कला दालन उभारले जाणार आहे. त्यामध्ये चित्रकार, शिल्पकार, हस्तकारागीर यांना कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थांचे स्टॉल, विविध वाद्य आणि संगीताचे दर्जेदार कार्यक्रमही महोत्सवात होतील. महोत्सवात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी समन्वयक प्रशांत जाधव, प्राचार्य अजय दळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फौंडेशनने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com