अपुरा पाणी पुरवठा

अपुरा पाणी पुरवठा

सी, डी वॉर्डमध्ये
कमी दाबाने पाणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः बालिंगा उपसा केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर काल दुपारी बंद पडल्याने आज शहरातील सी, डी वॉर्ड, तसेच काही ग्रामीण भागातील पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे महापालिकेने आवश्यक त्या ठिकाणी दिवसभर टॅंकरने पाणीपुरवठा केला. ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती वेगाने करण्यात आली.
बालिंगा उपसा केंद्राच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये काल शॉर्टसर्किट झाले. त्याची दुरुस्ती आवश्‍यक असल्याने तातडीने कामाला सुरुवात झाली. त्यामुळे पाणी उपसा बंद पडला. साहजिकच आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. आज सायंकाळनंतर दोन पंपातून उपसा सुरू झाला असून, उद्या (ता. ७) पाणीपुरवठा बंद असलेल्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. दुपारनंतर आणखी एका पंपातून उपसा सुरू होऊन सोमवार (ता. ८) पासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com