वि.स खांडेकर व्याख्यानमाला

वि.स खांडेकर व्याख्यानमाला

Published on

पद्मभूषण वि. स. खांडेकर स्मृती
व्याख्यानमाला गुरुवारपासून
डॉ. अभ्यंकर, देवयानी एम. आदींच्या व्याख्यानांची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः येथील शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिर संस्थेतर्फे गुरुवार (ता.११) पासून पद्मभूषण वि.स.खांडेकर व्याख्यानमालेला प्रारंभ होणार आहे. संस्थेच्या सभागृहात रोज सायंकाळी सहाला व्याख्यानाला प्रारंभ होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे.
व्याख्यानमालेचे यंदाचे त्रैचाळीसावे वर्ष आहे. गुरुवारी (ता.११) राष्ट्रीय आरोग्य संघटनेचे सचिव डॉ. शंतनु अभ्यंकर (वाई) ‘आधुनिक वैद्यक आणि पर्यायी पारंपरिक व पूरक उपचार'' या विषयावर संवाद साधतील. शुक्रवारी (ता.१२) योग ऊर्जा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवयानी एम. ‘लिव्ह लाईफ अ योगी‘ या विषयावर तर शनिवारी (ता.१३) राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे (मुंबई) ‘राष्ट्रवादाचा सामाजिक आशय'' या विषयावर संवाद साधतील. रविवारी (ता.१४) जबलपूरचे प्रशांत पोळ ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या विषयावर संवाद साधतील. व्याख्यानमालेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, व्याख्यानमाला समिती प्रमुख डॉ. आशुतोष देशपांडे, कार्यवाह अश्विनी वळीवडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com