पर्यावरणपुरक वाण

पर्यावरणपुरक वाण
Published on: 

लोगो - आली संक्रांत

संक्रांतीच्या हळदीकुंकुत
‘पर्यावरणपुरक’ वाण
युज अँड थ्रो वस्तू, प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः संक्रांत म्हंटले की महिलांचा ‘हळदी - कुंकु’ चा सोहळा. प्रत्येक महिला आपल्या घरात हळदी - कुंकुचे आयोजन करून सौभाग्याच्या लेण्यासोबतच वाणही दिले जाते. सर्वात जास्त चांगले वाण माझे कसे असेल, यासाठी चढाओढ असते. गेल्या काही वर्षात स्वस्तात मिळणारे प्लास्टिकचे डबे, युज अँड थ्रो वस्तू अशा दिखाऊ वस्तू वाण म्हणून देण्याची संख्या लक्षणीय होती. यंदा मात्र प्लास्टिक टाळा आणि पर्यावरणपुरक वस्तूच वाण म्हणून द्या, अशी चळवळ जोर धरू लागली आहे.
भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदी कुंकु समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपुरक कसे करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांनी प्लास्टिकच्या वस्तूंना फाटा दिला आहे. विविध रोपे, मातीच्या कुंड्या, कापडी पिशव्या, हस्तकलेतून साकारलेल्या विविध वस्तू, रूमाल, स्टीलचे छोटे डबे किंवा इतर भांडी, बटवे, किचन ॲप्रन अशा रोजच्या वापरातील वस्तू घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. या पर्यावरणपुरक वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी शहरात विविध ठिकाणी ‘पर्यावरण पुरक वाणा’चे प्रदर्शनही भरवले आहेत. या प्रदर्शनांनाही महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
जानेवारीत संक्रांतीपासून ते फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत महिला संक्रांतीच्या हळदी कुंकु समारंभ आयोजित करतात. त्यानिमित्ताने एकमेंकींना वाण म्हणजेच भेटवस्तू देण्याची पंरपरा आजही जपली जाते. गेल्या काही वर्षांपर्यंत गृहोपयोगी वस्तू देताना त्या स्वस्त मिळतील अशा वस्तू घेण्याकडे कल वाढला. प्लास्टिकच्या वस्तूंचीच किंमती त्यामानाने कमी होत्या. मात्र प्लास्टिकबद्दल जनजागृती वाढल्याने वाणही पर्यावरणपुरक कसे देता येईल, यासाठी विक्रेत्यांनाही तशी जाहिरात केली आहे.
-------------------
चौकट
रोपांनाही मागणी
काहींनी नर्सरीतून तुळशी, कोरफड, गुलाब, भाज्यांच्या बिया, जास्वंदाची रोपे मोठ्या संख्येने घेऊन संक्रांतीच्या हळदीकुंकुसाठी तजवीज केली आहे. काहींनी वाणासाठी खास बीजगोळे तयार केले असून ‘पर्यावरणपुरक’ वाणातून त्या पर्यावरण संवर्धन, रक्षणाचा संदेशच संक्रांतीनिमित्त देणार आहेत.
-------
कोट
रोजच्या वापरातील वस्तू ज्या पर्यावरणपुरक असतील, त्या वाण म्हणून देत आम्ही गेली कित्येक वर्षे संक्रांतीचे हळदी - कुंकु करत आहोत. ग्रीन भिशी, गार्डन्स क्लबच्या सदस्यांचा यामध्ये सहभाग असतो. प्रत्येकीचे वाण वेगळे परंतू ते पर्यावरणपुरक असेल, याचीही काळजी घेतो.
- सुप्रिया भस्मे
-----
संक्रांतीला ही द्या पर्यावरणपुरक वाण
- कापडी पिशव्या
- फ्रीजमध्ये भाजी ताज्या ठेवणाऱ्या पिशव्या
- धान्ये, कडधान्यांचे पाकिट
- निवडलेल्या भाज्यांचे पाकिट
- फुले, फळे, पालेभाजी, फळभाज्यांच्या बिया
- सुकामेवा
- फळे
- पुस्तके
- सेंद्रिय खते
- मसाले पाकिट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.