डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अतिक्रमणे हटवण्यासाठी 'कृती समिती'ची निदर्शने

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे काम ही संथगतीने सुरू आहे.
Babasaheb Ambedkar statue
Babasaheb Ambedkar statueesakal
Published on
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे यापूर्वी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची धडक पुतळ्यास असलेल्या संरक्षक भिंतीला बसली आहे.

इचलकरंजी : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळील अतिक्रमणे काढून पुतळ्याचे सुशोभीकरण करावे. या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटना संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चैतन्यस्थळ कृती समितीच्या वतीने निदर्शने केली. याबाबतचे निवेदन महापालिकेच्या बांधकाम अभियंत्यांना दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे यापूर्वी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची धडक पुतळ्यास असलेल्या संरक्षक भिंतीला बसली आहे. परिणामी पुतळ्याच्या सन्मानास बाधा पोहोचत आहे. ही अतिक्रमणे काढावीत, तसेच पुतळ्याचे सुशोभीकरण करावे, यासाठी अनेक वेळा निवेदन दिली आहेत.

Babasaheb Ambedkar statue
करवीर-कागल तालुक्यांना जोडणाऱ्या दूधगंगा नदीवरील बंधाऱ्याची पडझड; पुलाचे काम पूर्ण न झाल्यास दुर्घटनेची शक्यता!

मात्र, अजूनही महापालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे काम ही संथगतीने सुरू आहे. १४ एप्रिलच्या आत पूर्ण करावे. झोपडपट्टीमधील प्रलंबित घरकूल योजनेचे काम मंजूर करून तत्काळ सुरू करावे, आदी मागण्यांसाठी निदर्शने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com