Kolhapur Politics
Kolhapur Politics sakal

Kolhapur Politics : मुरलीधर जाधव आणि चंद्रदीप नरके यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

माजी आमदार चंद्रदीप नरके आणि शिवसेना (ठाकरे गट) माजी जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेत प्रवेश केला.

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके आणि शिवसेना (ठाकरे गट) माजी जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेत प्रवेश केला. जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसह हाती भगवा झेंडा घेतला. त्यांच्या प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेचे महाअधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी काही पक्षप्रवेश होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मुरलीधर जाधव हे मुळचे जुने शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नेते त्यांच्यासोबत गेले. मात्र, जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणेच पसंत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना पक्षातूनच विरोध होऊ लागला.

ठाकरे यांनी त्यांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. त्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांनी शिवसेनेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांच्या पाठीशी संकटात ठामपणे उभे राहायचे.

आता शिवसैनिक संकटात असताना उद्धव ठाकरे म्हणतात, तुझं तू बघ. मुरलीधर जाधव यांनी याचा अनुभव घेतला आहे. ते सच्चे शिवसैनिक आहेत.’
दरम्यान, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. ते पूर्वी दोन वेळा शिवसेनेचे आमदार होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. करवीर,पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यातील त्यांचे हजारो कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन गाड्यांचा ताफा घेऊन दुधाळी मैदान येथे एकत्र आले. तेथून माजी आमदार नरके यांच्या नेतृत्वाखाली ते मिरवणुकीने सभास्थळी दाखल झाले. यावेळी गोकुळ संचालक अजित नरके, कुंभी कारखाना संचालक, बाजार समिती आजी माजी संचालक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी जाहीर प्रवेश करून आपली पुढील राजकीय वाटचाल निश्चित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com