

युवराज पाटील यांचे
किलबिलमध्ये व्याख्यान
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्या मंदिर व इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रा. युवराज पाटील यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थी घडवण्यात पालकांची भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानाला पालकांची उपस्थिती होती. दरम्यान, महिलांसाठी मेकअप, केक बनविणे कार्यशाळेसह होम मिनिस्टर स्पर्धा झाली. मनिषा राऊतखेडे पैठणीच्या मानकरी ठरल्या. तसेच मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, सचिव डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, राहूल शेट्टी आदी उपस्थित होते.
-----------
04193
दिग्विजय नादवडेकर
जिल्ह्यात प्रथम
उत्तूर ः भूगोल अध्यापक मंडळातर्फे दहावीसाठी घेतलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला. बेलेवाडी हुबळगी (ता. आजरा) येथील दिग्विजय नांदवडेकर (पिंपळगाव विद्यालय, ता. भुदरगड) याने १००पैकी ९८गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाची समृद्धी थोरवत हिने द्वितीय, आजरा हायस्कूलची सई भोसले हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रम हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ कुंभार, डी. एल. नंदीवाले, बापूसाहेब शिंदे, एस. टी. हाळवणकर यांनी प्रयत्न केले.
-----------
इंग्रजी शब्दनिर्मितीची
‘घाळी’मध्ये स्पर्धा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात इंग्रजी स्पेलींग व शब्दनिर्मिती या विषयावर स्पर्धा झाली. डॉ. घाळी महाविद्यालय व देवचंद महाविद्यालय यांच्यातील कराराच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. दोन्ही महाविद्यालयाचे पदवी व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. घाळी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने पदवी व पदव्यूत्तर अशा दोन्ही गटात पहिला क्रमांक पटकावला. देवचंद महाविद्यालयाने दुसरा क्रमांक मिळवला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. अनिल उंदरे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. डॉ. अनिल मगर, हेमा दोडके, ऋतुजा अक्कोळे, मेघश्री करमे यांची भाषणे झाली.
--------
gad12.jpg :
68373
राजवर्धन पाटील, प्रणिती देशपांडे
शिवाजी विद्यालयाच्या
विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या राजवर्धन पाटील व प्रणिती देशपांडे या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले. मुंबईच्या ग्रेटर बॉम्बे सायन्स टिचर असोसिएशनतर्फे ही स्पर्धा घेतली होती. राजवर्धन व प्रणिती यांची प्रोजेक्ट फेरीसाठी निवड झाली आहे. त्यांना मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांचे प्रोत्साहन तर निवेदिता बाबर यांचे मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.