

ich38.jpg
68895
इचलकरंजी : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना ओमप्रकाश दिवटे यांच्यासह मान्यवर.
इचलकरंजीत २५३५३ बालकांना डोस
पल्स पोलिओ लसीकरण : ११४ पथकांत ३४२ कर्मचारी नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
इचलकंरजी, ता. ३ : शहरात रोटरी परिवाराच्या सहकार्याने पल्स पोलिओ मोहीम राबविली. या मोहिमेचा प्रारंभ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (तांबे माळ) येथे महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते आणि नीलिमा दिवटे यांच्या उपस्थितीत केला.
मोहिमेत इचलकरंजी शहरातील ० ते ५ या वयोगटातील २५३५३ इतक्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण केले. मोहिमेसाठी शहरासाठी ११४ पथके तयार केली होती. ३४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी उद्या (ता. ४) पासून पाच दिवस शहरामध्ये घरभेटीचे आयोजन केले आहे. यामध्ये उर्वरित बालकांनाही पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ९६ पथके तयार केलेली असून १९२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती आयुक्त दिवटे यांनी दिली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश चव्हाण, रोटरी परिवाराचे संजय मेटे, आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.