चंदगड

चंदगड
Published on

68934
68935
हलकर्णी : कारखान्याच्या आवारात जमलेले ढेकोळीवाडीचे ग्रामस्थ.
...
मृतदेहासह ग्रामस्थांचा ‘दौलत’वर ठिय्या
जखमी कामगाराचा मृत्यू : ग्रामस्थ-प्रशासन आपापल्या म्हणण्यावर ठाम, रात्री उशिरापर्यंत तोडगा नाही
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : हलकर्णी (ता.चंदगड) येथील दौलत अथर्व कारखान्याचे कामगार कुंडू रामू पाटील (वय ५१, रा. ढेकोळीवाडी, ता. चंदगड) यांचे आज निधन झाले. कारखान्यात काम करीत असताना ते जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारखाना प्रशासनाने ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाटील यांच्या मृतदेहासह कारखानास्थळावर येऊन प्रशासनाला धारेवर धरले.
मृत पाटील हे कारखान्याच्या उत्पादन विभागात नोकरीला होते. १७ फेब्रुवारी रोजी ड्रेन हॉल उघडत असताना ते तोल जाऊन सुमारे १२ फूट खाली पडले. तिथे उपस्थित कामगार बापूसो दळवी व एकनाथ कुट्रे यांनी त्यांना सावरले व सचिव विजय मराठे यांना कळवले. त्यांनी तातडीने कारखान्याच्या डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पाटील यांना गडहिंग्लज येथे हलवण्यात आले. तेथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कारखान्यात कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, म्हणून ग्रामस्थांनी मृतदेहासह कारखाना गाठला. सचिव विजय मराठे यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने ५० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यावर कामगाराला विमा रक्कम मिळवून दिली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या मुद्द्यावर सुमारे दोन तासांहून अधिक चर्चा होऊनही तोडगा निघत नव्हता. त्यानंतर सिटू संघटनेचे प्रा. सुभाष देसाई व उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले घटनास्थळी आले. त्यांनीही प्रशासनाशी चर्चा केली. मात्र, कारखाना प्रशासन व ग्रामस्थ आपापल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघाला नाही.
...
‘कामगाराचा मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. त्याला नियमानुसार भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन बांधील आहे. मात्र, अवास्तव मागणी केल्यास ते नियमात बसत नाही.
  विजय मराठे, सचिव, दौलत-अथर्व साखर कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com