गड- कला अकादमी

गड- कला अकादमी

69429
बीड : गडहिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रायश्चित हे नाटक सादर केले.
-----------------
गडहिंग्लजच्या बालकलाकारांनी
बीडच्या रसिकांची जिंकली मने
गडहिंग्लज, ता. १० : विसाव्या राज्य बालनाट्याची अंतिम फेरी बीड येथे सुरू झाली. राज्यातून २४ नाटके सादर होणार आहेत. या अंतिम फेरीत गडहिंग्लजच्या इतिहासात प्रथमच धडक मारलेल्या गडहिंग्लज कला अकादमीच्या बालकलाकारांनी ‘प्रायश्‍चित’ बालनाट्य सादर करत उपस्थित बीडकरांची मने जिंकली.
कला अकादमीच्या बालकलाकारांनी पर्यावरणात बेसुमार झाडांची कत्तल होत आहे, त्यावर प्रकाश टाकत बालनाट्य सादर केले. डॉ. सतीश साळुंके लिखित ‘प्रायश्‍चित्त’ या नाटकाचे दिग्दर्शन शिवाजी पाटील यांनी केले आहे. नाटकाच्या माध्यमातून गडहिंग्लजच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्याने बालकलाकारांचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com