महिला दिन एकत्रित

महिला दिन एकत्रित

Published on

फोटो ः 69885

महिलांना मान, कर्तृत्वाचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान करत शुक्रवारी महिला दिन साजरा झाला. शासकीय - खासगी कार्यालये संस्था, संघटना, पक्ष तसेच शाळा - महाविद्यालयांमध्ये स्त्री शक्तीचा जागर झाला. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शहाजी विधी महाविद्यालय
वूमेन सेल तर्फे ''महिला सबलीकरण'' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई, सायबर सेल पोलिस निरीक्षक श्री मनोज पाटील, कोल्हापूर निर्भया पथकाच्या प्रमुख प्रणाली पवार उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक डॉ. अस्मिता पाटील, डॉ. सुचिता सुरगीहल्ली, प्रा. विक्रम इरले यांनी केले.
प्रथम सत्रात देसाई म्हणाल्या, ‘समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. महिलांनी स्वतःला कुठेही कमी लेखू नये व स्वतःच्या करियरवर भर द्यावा. दुसऱ्या सत्रात ''सायबर गुन्हे व घ्यावयाची काळजी'' या विषयावर पाटील यांनी सायबर गुन्हे घडण्याची कारणे व सायबर गुन्ह्यांचे प्रकार यावर माहिती दिली. तिसऱ्या सत्रात पवार यांनी ''निर्भया पथकाची कार्यपद्धती'' समजावून सांगितली. प्राचार्य डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन लाभले. समन्वयक डॉ. सविता रासम यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एम. सी. शेख, डॉ. सुहास पत्की, डॉ. अतुल जाधव यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
-----
सनगर गल्ली पतंजली योग वर्ग
डॉ. केतकी बंकापुरे यांनी मानसिक पातळीवर स्वतःची कशी काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. पतंजलीचे शांताराम पाटील, योगगुरू सुर्यकांत गायकवाड उपस्थित होते. शनिवारी (ता. ९) योगवर्गात सायली देवधर यांचे किर्तन होणार आहे.
--
ओरिएंटल इंग्लिश स्कूल टाकाळा
पाचवी ते नववीमधील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबीरात ज्युदो, कराटे, तायक्वोंदो, लाठी काठी या मर्दानी खेळाची माहिती देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सुधीर चव्हाण, प्राचार्या राजश्री चव्हाण, क्रीडाशिक्षक शरद पोवार, देवयानी पाटील, दीपशीखा कुलकर्णी उपस्थित होते.
--
एसटी संभाजीनगर आगार
ज्योस्त्ना नार्वेकर यांनी महिलांच्या सदृढ आरोग्याविषयी माहिती दिली. आगारातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आगार व्यवस्थापक शिवराज जाधव, कार्यशाळा अधिक्षक प्रमोद तेलवेकर, दिना पाटील, स्थानक प्रमुख कुंदन भिसे उपस्थित होते. पूजा गवळी यांनी आभार मानले.
-
लोकमान्य विद्यालय
संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या हस्ते महिला शिक्षिकांचा सत्कार झाला. बालमंदिर ते सातवीतील मुलींनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची वेषभूषा साकारली. मुख्याध्यापक अशोक पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल सुर्यवंशी यांनी केले. अर्चना कदम यांनी आभार मानले.
-
उडान मंच
लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर संचलित उडान मंच व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींसाठी पत्रलेखन स्पर्धा झाल्या. आठवी ते नववी या दोन गटात स्पर्धा झाली. पारितोषिक वितरण समारंभात जयश्री पाटील यांनी उडान मंच व लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. साधना पाटील, सुषमा पाटील, शिल्पा यादव व करूणा देसाई यांनी संयोजन केले.
-
जायन्ट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल
पौष्टिक भरड धान्यापासून पदार्थ बनविणेच्या स्पर्धा चौडेश्वरी मंदिरात झाल्या. डॉ. देवेंद्र रासकर यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले. कोल्हापूर पर्ल ग्रुपच्या मंदाकिनी साखरे, रवींद्र मेस्त्री, सुरेश खांडेकर, प्रकाश मोरे, सूर्यकांत मोरे, मार्गेश पाटील, सुरेश सुतार, कोष्टी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे, संचालिका शैला मोरे उपस्थित होत्या.
-
भाजप जिल्हा कार्यालय
महिलांसाठी मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिर झाले. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहूल चिकोडे, सरचिटणीस डॉ. राजवर्धन, गायत्री राउत, संगीता खाडे, डॉ. शिवानंद पाटील, डॉ. कौस्तुभ वाईकर, डॉ. सचिन चौगले उपस्थित होते. भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. राधिका जोशी, डॉ. मंजुश्री रोहिदास, डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. स्वाती नांगरे, डॉ. अश्विनी माळकर, डॉ. वहिदा तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. विजय आगरवाल, सुधीर हराळे, संतोष माळी, सुभाष माळी, सनी आवळे, प्रवीणचंद्र शिंदे, शशिकांत रणवरे, डॉ.आनंद गुरव, डॉ.श्वेता गायकवाड, अश्विनी गोपुगडे, तेजस्विनी पार्टे, कोमल देसाई, समयश्री अय्यर, सुष्मिता प्रभूदेसाई, डॉ.श्रीकांत सागावकर, डॉ. अवधूत देशपांडे, डॉ.नितीन लंगरे, डॉ. बालाजी पोवार, डॉ. विजय बांगर, दयानंद कोनकेरी उपस्थित होते.
-
रुईकर कॉलनी हास्य क्लब
राज्य कर उपायुक्त वैशाली काशीद आणि शर्मिला मिस्की यांनी मार्गदर्शन केले. मीनाक्षी इंगवले, व्यंकाप्पा भोसले, दत्तात्रय इंगवले यांनी संयोजन केले.
-
महिलांसाठी उद्या रक्तदान शिबिर
कोल्हापूर : मैत्र दिंडी, एफबी समुह, ओंकार वेलफेअर फौंडेशन, ब्लड ॲट २४ बाय ७, थॅलिसिमिया ऑर्गनायझेशन परिवार, रक्तमित्र धनंजय पाडळकर मित्र परिवारातर्फे रविवारी (ता. १०) सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. रक्तदान करण्याच्याहेतून येणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात येईल. रक्तदान करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान केला जाईल. विशेषत: ५० वर्षांवरील रक्तदान करणाऱ्या महिलांचा लक्षवेधी सन्मान असेल. अमोल सरनाईक, आभास पाटील, धनंजय नामजोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
-
शिवसेना, उत्तम उत्तुरे फाउंडेशन
राजारामपुरीत होम मिनिस्टरसह विविध पारंपरिक खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला.
शहरप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उद्योजक महेश उत्तुरे यांनी आयोजन केले. होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्यांना पैठणी साड्या बक्षीस दिल्या. महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत तसेच महिला बचत गटांसाठी योजना आणि कर्ज पुरवठ्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, संपर्क संघटिका जयश्री बालीकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनिल मोदी, शुभांगी पोवार, रघुनाथ टिपुगडे, हर्षल सुर्वे, मंजित माने, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते. पार्श्वगायक प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
-
श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय
कंदलगा : वैद्य ऋचा सांगवडेकर यांच्या संकल्पनेतून विश्वपंढरी समूहातर्फे महिलांची रक्त तपासणी व बॉडी कंपोझिशन इंडेक्स तपासणी शिबिर झाले. ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, विश्ववती चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजन सांगवडेकर, ट्रस्टच्या विश्वस्त विश्वा सांगवडेकर, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता सांगवडेकर, वैद्य ऋचा सांगावडेकर व चिकित्सालयाच्या वैद्य महिला, योग प्रशिक्षक प्राजक्ता सांगवडेकर, योगप्रशिक्षिका आणि इतर महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या. यावेळी महिला वर्गास भेटवस्तू देण्यात आली.
-
कर्मवीर इंग्लिश मीडियम
सानेगुरुजी वसाहत ः शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे तपोवन येथे सुरू असलेल्या रेम्बो सर्कसमधील महिला कलाकारांचा सत्कार झाला. मुख्याध्यापिका प्रियांका धनवडे, संस्था व्यवस्थापक ज्योती लगारे ,मीरा चौगले यांच्या हस्ते महिलांचे स्वागत झाले. रूपाली निकाडे, गीता तेरांगपी, सेलिना संगमा, बबिता खकलारी, देविका तमांग, पूजा गयान, मेनोती रभा, बेबी कुंजम्मा, मंदिरा अधिकारी, अलीना राय, ममता प्रवीण, सरिता मार्क, अंनु शानी, प्रीती, संजना, एलिना साळवे, झिरमिर तिरांगपी आदी महिला कलाकारांचा सत्कार झाला.
-
शहाजी महाविद्यालय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विविध स्पर्धांमधील क्रिकेट आणि कबड्डी संघातील विद्यार्थिनींचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण अध्यक्षस्थानी होते. आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर उपस्थित होते. भूगोल विभागातील प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे यांनी महिला दिनाची भूमिका सांगितली. ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रशांत पाटील यांनी संयोजन केले. डॉ. सुरेखा मंडी यांनी आभार मानले. स्त्री व्यक्तिमत्व विकास समिती, सखी मंचतर्फे आयोजन केले.
...

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा
डॉ. इला माटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवि संमेलनात कमल हर्डीकर, निलांबरी कुलकर्णी, सुजाता पेंडसे, डॉ. प्रमिला जरग, डॉ. प्रिया अमोद, डॉ. सुप्रिया आवारे, सविता नाबार, ज्योत्स्ना डासाळकर, सोनल सोनटक्के, डॉ. रफीक सूरज, हेमंत डांगे यांनी कविता सादर केल्या. सभेच्या उपाध्यक्ष गौरी भोगले यांनी स्वागत केले. कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी आभार मानले.
...
परिवर्तन फाउंडेशन
रणरागिणी पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव केला. नवग्रह रत्न केंद्राच्या रत्नशास्त्री अनुश्री एच. मोतीवाला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अँटी करप्शन विभागाच्या आस्मा मुल्ला, आजरा येथील रुपाली पाटील, संध्याराणी सूर्यवंशी, जांभळीच्या इंद्रायणी यादव, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त प्रदीपा फावडे, आंतरराष्ट्रीय नेमबाज सांभवी क्षीरसागर, छत्रपती शिवाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आरती भोसले, सिद्धांत हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ. अनुष्का वाईकर, साहित्यिक कृष्णात चौगले आदींना गौरवले. उद्योजिका स्निग्धा नरके, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, मनिषा कुरणे, शशी चौगले, उद्योजक राहुल पाटील, जिल्हा परिषद डी.आर.डी.ए.चे व्यवस्थापक सचिन पाटणकर, निवास सूर्यवंशी, दिलीप कुडाळकर, सुनील कुंभार, राज कुरणे आदी उपस्थित होते. अमोल कुरणे यांनी स्वागत केले. संभाजी चौगले यांनी प्रास्ताविक केले. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. संजय सुळगावे यांनी आभार मानले.
-
महावितरण कार्यालय ताराबाई पार्क
कोल्हापूर : कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात महिलांनी समतोल साधावा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी दिला.
स्वयंसिद्धा संस्थेच्या सदस्य सुरेखा उबारे यांनी मनोगत व्यक्त केले. कर्करोग तपासणी शिबिरास महिलांचा प्रतिसाद मिळाला. डॉ. नम्रता बिरजे, प्रभारी सहायक महाव्यवस्थापक स्नेहा पार्टे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) सुमन पाटील उपस्थित होत्या. सहायक अभियंता स्मिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.
-
उचगाव परिसर
उचगाव पूर्व जानकीनगर मध्ये सांस्कृतिक महिला मंडळातर्फे रॅली काढण्यात आली. अध्यक्षा जोती भुई, सचिव सीमा पाटील, लता देसाई, संगीता माळी,मयुरी सांवत, पूजा खोरी, सोनाली पाटील, वृशाली पाटील, सविता हावळ, नीरजा जिरगे, आशा अंबपकर, कल्पना डाफळे, जोती भोसले, पूजा माजगावकर उपस्थित होत्या.
-------
शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल
आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून खडतर परिश्रम केल्यास हमखास यश प्राप्ती होत असल्याचा कानमंत्र विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांनी दिला. मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा परिसंवाद झाला. आंतरभारती शिक्षण संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे, मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, राज्य कर विभागाच्या उपायुक्त वैशाली अतकरे- पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील, पुण्याच्या पोलीस उपनिरीक्षक (सीआयडी) दीपाली अतकरे - पाटील, चिपळूणच्या एएचए हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्राचार्या तथा आकार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी कार्वेकर - ओतारी, मीरा डे केअरच्या संचालिका चित्रा भोई - सुपेकर, फॅशन डिझायनर विशाखा वसंत चिले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल कपिलेश्वरी, सोनाली महाजन यांनी केले. निर्मला शेळके यांनी आभार मानले. पर्यवेक्षक एस पी पाटील उपस्थित होते.
-

दोन कॉलम घेणे

69719

कर्तव्ये पार पाडा, कुटुंबाचे
सहकार्य मिळते ः श्वेता बुरगे

कोल्हापूर, ता. ७ ः महिलांनी आपली कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडली तर आपल्याला कुटुंबाचे सहकार्य मिळतेच आणि त्यामुळे आपला छंद जोपासता येतो, असा कानमंत्र रायडर श्वेता बुरगे यांनी महिलांना दिला. निमित्त होते वनिता सांस्कृतिक संस्थेतर्फे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे.
त्या म्हणाल्या,‘‘मला बाईक रायडिंगचा छंद आहे. सहसा हा छंद महिलांना असत नाही. तरीही कुटुंबाच्या पांठिब्यावर आणि धैर्यामुळे मी हा छंद जोपासू शकते.’’ त्यांनी रायडिंग करताना येणाऱ्या विविध अनुभवांचे कथन केले. संस्थापिका प्रा. डॉ. अनुराधा सामंत यांनी यंदाच्या जागतिक महिला दिनाचे ब्रिदवाक्य ‘प्रेरणा आणि समावेश’ याचे महत्व सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘ महिलांचे सक्षमीकरण, लिंगभाव समानता हे प्रत्यक्षात आणले पाहिजे. त्यासाठी महिलांना प्रोत्साहित करा, जागृत करा. सहाय्य आणि संसाधने प्रदान करून महिलांना अडथळ्यांवर मात करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते.’’ रिद्धी कुलकर्णी यांनी स्वागत केले. कविता कुरळे यांनी आभार मानले.
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com