‘माझी जबाबदारी’ वर पत्रलेखन स्पर्धा

‘माझी जबाबदारी’ वर पत्रलेखन स्पर्धा

ich101.jpg
70179
इचलकरंजी : जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
---------
‘माझी जबाबदारी’ वर पत्रलेखन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघातर्फे ‘मी मतदार : माझी जबाबदारी’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदाराला राजा संबोधले जाते. या राजाची नेमकी जबाबदारी काय, हे सांगणारे २०० ते २५० शब्दांचे पत्र या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. पत्रलेखकांनी पत्र १५ एप्रिलपूर्वी समाजवादी प्रबोधिनी, ५३६/१८ , इंडस्ट्रियल इस्टेट, इचलकरंजी या पत्त्यावर पाठवावेत. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना समारंभपूर्वक रोख रक्कम व सन्मानपत्राने गौरवले जाणार आहे. स्पर्धेत अधिकाधिक पत्रलेखकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. प्रसाद कुलकर्णी यांना ‘स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्याहस्ते सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com