पक्षी रक्षणासाठी राखीव खाद्य

पक्षी रक्षणासाठी राखीव खाद्य

पक्षांसाठी खाऊचा वाटा, पिकांसाठी उपक्रम मोठा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १० ः पक्षी शेतीतील पिके खाऊन नुकसान करतात म्हणून त्यांना गोफन चालवून हुसकावले जाते. या उलट पक्षांना खान्यासाठी खाद्य देण्यापासून ते त्यांचे खाद्य सुरक्षीत ठेवण्यासाठी काही उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे पक्षांचा वावर वाढून पिकांवरील बागेतील फळ फुलाच्या झाडावरील जंतू संसर्ग कमी होऊन चांगली फलधारणा होण्यास मदत होते. याचे महत्व जाणून ‘पक्षांसाठी खाऊचा वाटा’ ही संकल्पना सुरू झाली आहे.
त्र्यंबोली टेकडी, शिवाजी विद्यापीठ आवार, पक्षी तिर्थ, रंकाळा हिरवाई पथ, शहरातील उद्यानांसह घरोघरी पक्षांना खाद्य व पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम पक्षी प्रेमींनी राबवला आहे. त्यामुळे पक्षी येऊ लागले असा अनुभव आहे. पक्षाच्या आगमनामुळे घरातील गच्चीवर लावलेलीफुले झाडे, भाजीपाला, वेली रोपांवरील जंतू संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे फलधारणा चांगली होण्यास मदत झाल्याचा अनुभव निसर्गप्रेमी विजय पाटील यांनी सांगितला.
एका रोपाला लागलेल्या अनेक फळापैकी एक दोन फळ किंवा त्यातील बिया पक्षांनी खाणे किंवा त्या बिया खाण्यासाठी फळाच्या झाडावर पक्षांनी येणे अपेक्षित आहे. पक्षी आले तर ते पिकाबरोबर त्यावरील जंतूही खातात. पिकावरील किंवा फळाच्या रोपावरील जंतू संसर्ग कमी होतो. असा अनुभव आहे. या उलट पिके पक्षांनी खाल्ली की नुकसान होते अशा धारणेतून पिकावरून पक्षांना हुसकावण्यासाठी भुजगावणे लावणे, आवाज काढणे, डबे वाजवणे, गोफन फिरणे असे प्रकार घडतात. यातून पक्षी येत नाहीत. तेव्हा रोगांचा प्रार्दुभाव पिकांवर होतो. पिके कोमजून जातात यातही नुकसान होते असाही सर्रास अनुभव आहे.
काही वर्षापूर्वी कणेरी मठावरील एकर शेतीमध्ये पक्षांना न हुसकावत पक्षांनी पिके फळे खायची तितकी खाऊ द्यायची, असा प्रयोग झाला. पक्षी येऊ लागले तसा पिकावरील जंतू संसर्ग कमी झाला. येथे अनेक शेतकऱ्यांनी प्रयोग जाणून घेतला. शेतीत गोफन बंद केली. पक्षी येऊ लागले. जंतूसंसर्ग टाळण्यास मदत झाली. शेतीत ज्वारीचे पीक चांगले आले असा अनुभव घोसरवाड येथे शेत विकास सोसायटीचे सचिव राजू डवरी यांनी सांगितला.

कोट
एकाच शेतीत जास्त पक्षी येऊन त्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ शकते हीच बाब विचारात घेता जास्ती जास्त शेतीतून पक्षांना हुसकावणे बंद केले तर पक्षी एकच ठिकाणच्या शेतीतील पिके जास्त प्रमाणात न खाता सर्वत्र थोड थोडे खातील. शेतीत सर्वत्र पक्षांचा वावर वाढल्यास जंतू संर्सग कमी होण्यास मदत होईल. पिकांची गुणवत्ता वाढण्यास मदत होऊ शकते.
-डॉ. एस. बी घुले, शेती अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com