सहकारातील दीपस्तंभ ः (कै) श्रीपतराव देसाई (आबाजी)

सहकारातील दीपस्तंभ ः (कै) श्रीपतराव देसाई (आबाजी)

डोके - श्रीपतराव देसाई श्रद्धांजली
---------------------------------

ajr101.jpg :
70300
(कै) श्रीपतराव देसाई
-----------------------------------

सहकारातील दीपस्तंभ : (कै) श्रीपतराव देसाई (आबाजी)

जनता सहकारी बॅंक, लि. आजराचे माजी अध्यक्ष, बळीराजा संस्था समूह पेरणोलीचे संस्थापक अध्यक्ष व पेरणोलीचे माजी सरपंच (कै) श्रीपतराव देसाई (आबाजी) (वय ९२) यांचे निधन झाले. सहकारातील एक दीपस्तंभ हरपला. त्यांच्या कार्याच्या आठवणी आजही तालुक्यासह सहकार वर्तुळात आहेत. एक धडाडीचे व आश्वासक नेतृत्व म्हणून तालुक्यासह जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या कार्याचा यानिमित्त घेतलेला उजाळा...
- रणजित कालेकर, आजरा
-----------
श्रीपतराव बचाराम देसाई यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात ५ एप्रिल १९३४ मध्ये एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात पेरणोली (ता. आजरा) येथे झाला. पावसाळ्यात मुसळधार पाऊस व मूलभूत सेवा सुविधांपासून आजरा तालुका हा त्याकाळी तसा वंचित होता. दळवळणाची कोणतीही सेवा सुविधा नाही. शेतीवर गुजराण करणे एवढचं त्याकाळातील जनतेचं जगण होत. अशा काळात त्यांचे बालपण पेरणोलीसारख्या खेड्यात गेले. त्याकाळात मोलाचे समजले जाणारे चौथीपर्यंतच शिक्षण त्यांनी घेतले. पुढे त्यांनी शेती व्यवसायाशी जोडून घेतले. त्यांचे आईवडील व पाच भावांसह एकत्रित कुटुंब होते. या कुटुंबात जवळपास ५० माणसांचा राबता होता. कुटुंबात ज्येष्ठ असल्याने त्यांच्यावर साऱ्या कटुंबाची जबाबदारी पडली. शेती करतच वयाच्या विसाव्या वर्षांपासून सामाजिक, राजकीय व सकारात्मक कार्यात त्यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी गावच्या राजकारण व समाजकारणात उडी घेतली. साठच्या दशकात तत्कालीन आजऱ्याचे द्रष्टेनेते (कै) अमृतरावकाका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व समाजकारणात काम सुरू केले. पुढे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष (कै) बळीराम देसाई, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष (कै) राजारामबापू देसाई, (कै) वसंतराव देसाई (कै) काशिनाथअण्णा चराटी, (कै) माधवराव देशपांडे यांच्यासोबत तालुक्याच्या राजकारणात काम केले.
१९७८ ते २००८ पर्यंत सलग तीस वर्ष पेरणोली ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून काम केले. वीस वर्ष सरपंचपदाची धुरा सांभळली. त्यांची जनता सहकारी बँक आजराच्या संचालकपदी १९८४ मध्ये निवड झाली. बॅंकेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी काही काळ सांभाळली आहे. बॅंकेच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. श्री केदारलिंग विकास सेवा संस्था, श्री. रवळनाथ दूध संस्था, श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था व राजर्षी शाहू ग्राहक संस्थेचे संस्थापक होते. यातील सर्वच संस्थेच्या अध्यक्षपदी काम केले आहे. बळीराजा पतसंस्था १९८८ मध्ये स्थापन झाली. या संस्थेची सुमारे १५ कोटींवर उलाढाल असून तीन शाखा कार्यरत आहेत. आजरा तालुक्याच्या पश्चिम भागावर त्यांची राजकीय कमांड होती. खासदार उदयसिंगराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार व्ही. के. पाटील, नरसिंगराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, बजरंग देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासोबत काम केले आहे. पतंगराव कदम हे त्यांचे जवळचे नातेवाईक. त्यांच्या सहकार्याने विविध विकासकामे केली आहेत. एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्‍व म्हणूनही त्यांची ओळख होती. कृषीक्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. पेरणोली पंचक्रोशीमधील शेतीच्या प्रगतीसाठी सहकारी पाणीपुरवठा योजना राबवल्या आहेत. कृषी, सहकार, बँकिंग, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रांत त्यांचे काम उल्लेखनीय होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com