शालेयस्तरावरील स्पर्धाना हवा संयोजकांचा हातभार

शालेयस्तरावरील स्पर्धाना हवा संयोजकांचा हातभार

फुटबॉल चित्र वापरावे...
............
शालेयस्तरावरील स्पर्धाना हवा संयोजकांचा हातभार

फुटबॉलप्रेमी पालकांमधून मागणी ः तंत्रशुद्ध प्रशिक्षण अकादमीचीही गरज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः फुटबॉलचा गवगवा असणाऱ्या कोल्हापूर शहरात व्यावसायिक फुटबॉलपटूंचा टक्का वाढावा, यासाठी आता वरिष्ठ गटातील स्पर्धांसह ११, १३, १४, १५ आणि १७, १९ वर्षांखालील मुला-मुलींच्याही जास्तीत जास्त स्पर्धा भरविल्या जाव्यात. त्यासाठी संयोजकांनी हातभार लावणे अत्यंत आवश्यक असून, याशिवाय तंत्रशुद्ध प्रशिक्षण अकादमीही सुरू करावी, अशी मागणी फुटबॉलप्रेमी पालकांमधून होत आहे.
कोल्हापुरात स्वातंत्र्यपूर्व काळापासून फुटबॉलला राजाश्रय मिळाला आहे. पेठापेठांमधील तालीम, संघ, क्लबमध्ये कुस्तीसोबत फुटबॉल खेळाकडे अनेकजण आकर्षित झाले. खेळाच्या जोरावर अनेकांना नोकऱ्याही मिळाल्या. आजही फुटबॉल हंगामात छत्रपती शाहू स्टेडियमवर नामांकित संघांकडून खेळायचे आणि मेस्सी, नेमार, रोनॉल्डोसारखे व्हायचे स्वप्न अंगी बाळगायचे. त्यासाठी कोणती तंत्र कौशल्ये लागतात याचा अभ्यास केला जात नाही. केवळ संतोष ट्रॉफी स्पर्धा खेळली की, सरकारी, निमसरकारी, रेल्वे, पोस्टात नोकरी लागते, असा समज अनेकांनी करून घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने फुटबॉल पंढरीतील खेळाडूंना दिशा देण्यासाठी ११ ते १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी जास्तीत जास्त स्पर्धा आणि त्यासाठी संयोजकांनी पुढे यावे, अशी मागणी फुटबॉलप्रेमी पालकांकडून होऊ लागली आहे.
...
चौकट...
मेस्सी, एमबाप्पे, नेमारची क्रेझ
कायलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनॉल्डो, नेमार, ऑस्कर, आंद्रेस, ईडन हॅझर्ड, मोहम्मद सलाह, केवीन डी ब्रुययन, सुनील छेत्री यांचीच सर्वाधिक क्रेझ लहान मुला-मुलींमध्ये आजही आहे. कोल्हापूरचा अनिकेत जाधव, निखिल कदम यांचेही व्हीडीओ सर्वाधिक पाहिले जातात.
.............
चौकट...
व्यावसायिक फुटबॉलपटू तयार होण्यासीठी हेही आवश्‍यक...
- वयाच्या आठव्या वर्षांपासून तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज
- जेवणात पुरेशा प्रमाणात प्रथिने, कार्बोहायहाड्रेटस् आणि द्रव्य पदार्थ आवश्‍यक
- ९० मिनिटे मैदानावर टिकून राहण्यासाठी तंदुरुस्ती आवश्‍यक
- चेंडूवर नियंत्रण , ड्रीबलिंग कौशल्य, शरीरावर नियंत्रण आवश्‍यक, आत्मविश्‍वास, निर्णय क्षमता हवी
- व्यावसायिक तंत्रशुद्ध प्रशिक्षक, फुटबॉल अकादमी आवश्‍यक
------
कोट
कोल्हापुरात व्यावसायिक फुटबॉल संघ नाहीत. मात्र, व्यावसायिक खेळाडूंना लागणारी ऊर्मी येथील खेळाडूंमध्ये नक्कीच आहे. लाखो-कोटींचे मानधन घेणारे खेळाडू तयार व्हायचे असतील तर ११ ते १९ वर्षांखालील जास्तीत जास्त स्पर्धा होणे आवश्‍यक आहेत. यासाठी वरिष्ठ गटाप्रमाणेच संयोजकांनी पुढे येण्याची गरज आहे.
- अमित शिंत्रे, फुटबॉल प्रशिक्षक
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com