लोकसभेनंतरच विद्यापीठात प्राध्यापकांची भरती

लोकसभेनंतरच विद्यापीठात प्राध्यापकांची भरती

विद्यापीठ ... लोगो
...
लोकसभा निवडणुकीनंतरच
विद्यापीठात प्राध्यापकांची भरती
मराठा आरक्षणामुळे बिंदूनामावलीची नव्याने प्रक्रिया; एकूण ७२ पदे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी विद्यापीठात प्राध्यापकांची एकूण ७२ पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. त्याबाबतची प्रक्रिया विद्यापीठाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु केली. मात्र, मराठा आरक्षणामुळे बिंदूनामावली (रोस्टर) नव्याने तयार होणार आहे. त्यामुळे आणि आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे या निवडणुकीनंतरच भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे.
राज्यातील विविध १५ अकृषी विद्यापीठे आणि शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील शिक्षक, शिक्षक समकक्ष अशी ६५९ पदांच्या भरतीला शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये मान्यता दिली. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाला एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली. त्यामध्ये सहायक प्राध्यापक ६२ आणि सहयोगी प्राध्यापकांची १० पदे आहेत. भरतीसाठी मान्यता मिळालेल्या पदांच्या अधिविभागनिहाय बिंदूनामावली तयार करून त्याची तपासणीचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनाने शासनाकडे पाठविला. त्याला गेल्या महिन्यात शासनाची अंतिम मान्यता मिळाली. त्यानंतर अर्जासह अन्य प्रक्रियेबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास व्यवस्थापन परिषदेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मान्यता दिली. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली. राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले. त्यामुळे या आरक्षणानुसार आता भरती प्रक्रियेसाठी बिंदूनामावली तयार करण्याचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरु आहे.
...
प्रशासनाची योग्य कार्यवाही
मराठा आरक्षण जाहीर झाल्यामुळे रोस्टरची प्रक्रिया नव्याने होईल. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरु होईल. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल. विद्यापीठ प्रशासन याबाबत योग्य ती कार्यवाही करत असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वागत परुळेकर यांनी दिली.
....
विद्यापीठातील प्राध्यापकांची मंजूर पदे ः २६२
रिक्त असेलली पदे ः १३९
सध्या कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांची संख्या ः१२३
भरती होणाऱ्या पदांची संख्या ः ७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com