Sanjay Pawar
Sanjay Pawaresakal

Sanjay Pawar : प्रसंगी तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, पण मागं हटणार नाही; असं का म्हणाले ठाकरे गटाचे नेते संजय पवार?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मूळचा आक्रमकपणा कदापि सोडणार नाही.
Published on
Summary

‘३४ वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करत आहे. एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच आत बाहेर केलेले नाही.'

आजरा : अन्यायाविरोधात लढा देणे हे आमच्या रक्तात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मूळचा आक्रमकपणा कदापि सोडणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी तुरुंगात जावे लागले तरी चालेल; परंतु मागे हटणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी स्पष्ट केले.

येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे प्रमुख उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल संभाजी पाटील यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते झाला. पवार म्हणाले, ‘३४ वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करत आहे. एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीच आत बाहेर केलेले नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ठाकरे यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली. शिवसेनेला आज चांगले दिवस येत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांसाठी व अन्यायाच्या विरोधात शिवसेना पेटून उठेल.’ 

Sanjay Pawar
साताऱ्यासाठी शरद पवारांचा 'गेम प्लॅन'; महायुतीच्या उमेदवारावर ठरणार पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार, सस्पेन्स वाढला

सुरेश पोवार, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, राधानगरी तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील, कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, अनिल दळवी, रणजीत पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील उपस्थित होते. तालुकाप्रमुख युवराज पवार यांनी स्वागत केले. दयानंद भोपळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com