क्षीरसागर - ८८ हजार शेणी स्मशानभूमीला

क्षीरसागर - ८८ हजार शेणी स्मशानभूमीला

75270
कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे वडील विनायकराव क्षीरसागर यांच्‍या उत्तरकार्यानिमित्त पंचगांगा स्मशानभूमीला ८८ हजार शेणी देण्यात आल्या. यावेळी सुजित चव्हाण, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


स्माशानभूमीस शेणी देऊन
वडिलांना आदरांजली
राजेश क्षीरसागरांची सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सामाजिक कार्याच्या जाणीवेतून वडील विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्यावेळी स्मशानभूमीला शेणी देऊन त्यांना आदरांजली वाहिली. क्षीरसागर यांनी शिवसेनेतर्फे महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीकडे ८८ हजार शेणी सुपूर्द केल्या.
जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी कै. विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शेणी देत असल्याचे सांगितले.
महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत शेणी प्रशासनाकडे देण्यात आल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख नीलेश हंकारे, उपशहरप्रमुख सुरेश माने, कपिल नाळे, रणजित मंडलिक. सम्राट यादव, विनायक जाधव, प्रसाद चव्हाण, रोहन शिंदे, उदय पोतदार, संतोष दिंडे, अभिलाष चव्हाण, ओम कांबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com