डांगडूंग

डांगडूंग

डांगडूंग
ंं
75293

चळवळीचा
विजय असो!

आमचे परममित्र रा. रा. जे की शिवार ते संसद तथा शेतकऱ्यांचा कैवार, घामाचं घेणार, घेतल्याशिवाय राहणार नाही. यांसी आसूडासारखा कडक, कडक शॅल्यूट आणि नमस्कार.

पत्र लिवण्यास कारण, की...
आपल्या ‘एकला चलो’च्या वाटंला, आमचा मुजरा, ‘एक नोट आणि एक वोटला’बी आमचा मुजरा. चळवळीतून राजकारण आणि राजकारणातून चळवळ जिवंत ठेवल्याबद्दल आमच्या समस्त शेतकरी बांधवांतर्फे आणि शेतकऱ्यांच्या पोरांतर्फे आपणास शुभेच्छा.. खासदारकीला आपण महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी लय रेटून ताकद लावली, शेवटपर्यंत ते काय सक्सेस झालं नाही, अखेरीस आपण कसलीही म्हंजी कसलीही तडजोड केली नाही, आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आणि आपली वाट आपण निवडली. पर आम्हास्नी एक वाटत हुतं, की आपण मशाल हातात घ्याला पाज्ये हुती, त्याचं कारण असं की
आपली शिट्टी आणि त्यांची मशाल असती का, की ताकद लागली असती, कसं का की, जसं आपण पिकं राखाय गेल्यावर जनावरं, पाखरं हुसकाय, आंऽऽऽ, आंऽऽऽ, आंऽऽऽ, हुर्रऽऽऽ, हुर्रऽऽऽ हुर्रऽऽऽ, आहा, आहा! असं वरडतो. आणि रातचाला राखण करायला गेल्यावर जाळबी कराय लागतोया,
तसं या निवडणुकीत आपणास ईरोधकांची जनावरं आणि पाखरं हुसकायं आपली शिट्टी आणि मशालीचा जाळ उपोगी पडला असता, असं आम्हास्नी लई वाटत हुतं.
त्यासाठी आमी पाच-सहा दिवट्या, दोन-चार मशाली तयार करून ठेवल्या होत्या. आज आपण मशाल हातात घ्याल, उद्या मशाल हातात घ्याल, असं आमास्नी वाटत हुतं; पण ते काय घडलं नाही. पण असो भविष्यात या दिवट्या, मशाली आणि आपणास किंबहुना आपल्या चळवळीला उपोगी पडतील. आमी त्या जपून ठेवू.
आपल्यासाठी, आपल्या चळवळीसाठी...
--------------------
चळवळीचा विजय असो.......
-
तुमचाच जीवाभावाचा मैतर
- सबना मास्तर.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com