प्रकल्प बंद करा

प्रकल्प बंद करा

जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प
बंद करण्याचे आदेश द्या
दिलीप देसाई : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी
कोल्हापूर, ता. ४ : महापालिकेतर्फे एस. एस. सर्व्हिसेसकडून चालवल्या जाणारा कसबा बावडा येथील जैव वैद्यकीय कचरा प्रकल्प त्वरित बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, सचिवांकडे ई-मेलद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमबाह्यरित्या प्रकल्पाला परवाना दिला आहे. जानेवारी २०२४ मधील सोलापूर येथील जैव वैद्यकीय कचरा कोल्हापुरात आणला असून, तो पडून आहे. हा घातक कचरा कोणत्या वाहनाने कोल्हापुरात आला, त्याची साठवणूक कशा पद्धतीने केली, ४८ तासांत त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता येथील प्रकल्पाची आहे काय? याची चौकशी होणे अपेक्षित आहे. नागरी वस्तीमध्ये या प्रकल्पास परवाना देता येत नाही. तरीही आजअखेर पंधरा वर्षे प्रदूषण नियंत्रण मंडळ कशाच्या आधारे परवाना देत आहे? जितका धूर प्रकल्पाच्या चिमणीतून जातो त्याहून अधिक दूर चिमणी खालून परिसरात पसरतो. जैववैद्यकीय कचरा पिशव्या न उघडता भस्‍मीकरण यंत्रात जाणे आवश्यक असताना दहा-बारा महिला पिशव्या सोडून कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी काम करतात. कचरा उघडला जातो. अत्यंत बेफिकीर ही कृती आहे. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्याला साथ देत आहेत. सोलापुरातून आणलेला कचरा प्रक्रिया करून नष्ट करण्यासाठी तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतेही नियोजन केलेले नाही. प्रकल्पामुळे आणि बेकायदेशीर जैव वैद्यकीय कचरा हाताळणीमुळे परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. यातून विषाणूंची बाधा परिसरातील नागरिकांना होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महानगरपालिका, ठेकेदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, प्रकल्पास दिलेला परवाना त्वरित रद्द करून प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात यावेत, प्रकल्प नागरी वस्तीपासून दूर अथवा औद्योगिक वसाहतीत करण्याबाबत आदेश देण्यात यावेत. अन्यथा, न्यायालयात दाद मागण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com