कर्मचाऱ्यांचा पगार कपात

कर्मचाऱ्यांचा पगार कपात

75327
कोल्हापूर : आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी अचानक पाहणी केली.

गैरहजर नऊ कर्मचाऱ्यांचा
एक दिवसाचा पगार कपात
आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर, ता. ४ : विना रजा गैरहजर राहणाऱ्या आरोग्य विभागाच्या नऊ कर्मचाऱ्यांचा पगार कपात करण्यात आला. तसेच त्यांच्या हजेरीपत्रकाचे काम पाहणारे तसेच आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आज रुईकर कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयास अचानक भेट दिली. त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी पुस्तके तपासली. त्यात १३ कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. यापैकी चार कर्मचाऱ्यांनी रजा अर्ज दिले होते. उर्वरित कर्मचारी विना रजा गैरहजर राहिले होते. त्यामुळे रोकडे यांनी नऊ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश दिले. तेथील हजेरीपत्रकाचे काम पाहणारे सुधाकर कुंभार व आरोग्य निरीक्षक मुनीर फरास यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिले.
त्यानंतर महाडिक माळ येथील कामाच्या ठिकाण असलेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी ते सर्व कामावर हजर असल्याचे दिसले. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना अचानक हजेरी तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रोकडे यांनी तपासणी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, आरोग्य निरीक्षक मुनीर फरास, मुकादम उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com