टाटा तनिष्कची गुढीपाडवा ऑफर

टाटा तनिष्कची गुढीपाडवा ऑफर

‘टाटा तनिष्क’तर्फे
गुढीपाडवा ऑफर
हमखास सोने, चांदीचे नाणे मिळणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची खरेदीसाठी टाटा तनिष्कमध्ये प्रत्येक खरेदीवर हमखास सोने व चांदीचे नाणे देण्यात येणार आहे. दहा ग्रॅमच्या आतील खरेदीस ५ ग्रॅमचे चांदीचे नाणे व १० ग्रॅमवरील प्रत्येक १० ग्रॅमसोबत २०० मिलीग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे. ही ऑफर रविवार (ता. ७) ते मंगळवार (ता. ९) पर्यंत आहे. सोबतच हिरेजडीत दागिन्यांच्या १२ हजारांच्या खरेदीवर २०० मिलीग्रॅमचे २२ कॅरेट सोन्याचे नाणे मोफत मिळणार आहे.
टाटा तनिष्कमध्ये मिळणारी सर्वोत्तम ग्राहक सेवा, दागिने तपासणीकरिता कॅरेट मीटरची व्यवस्था, प्रत्येक दागिन्यासोबत मिळणारे शुद्धतेचे प्रमाणपत्र, विक्री पश्‍चात देशभरात कोणत्याही तनिष्कमध्ये मिळणारी सेवा या सर्व वैशिष्ट्यांमुळे भारतातील सर्वांच्या आवडीचा ज्वेलरी ब्रँड ठरला आहे. सध्या टाटा तनिष्कमध्ये जुने सोने बदलून नवीन दागिने खरेदीचाही फायदा ग्राहक घेऊ शकतात. या ऑफरमध्ये कॅरेटनुसार दर देऊन कोणतेही वजावट न करता पूर्ण रक्कम पकडली जाते. तनिष्कमध्ये एक हजारहून अधिक मंगळसूत्र, बांगड्याचे विविध नमुने, नेकलेस, नेकलेस सेट कर्णफुले, अंगठ्या व महाराष्ट्रीयन कलाकुसरीचे सर्व दागिने विक्रीस उपलब्ध आहेत. तरी तनिष्कमध्ये सुरू होणाऱ्या कॉईन ऑफरचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन तनिष्क दसरा चौकचे मालक प्रसाद कामत यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com